(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Teachers Day : आज 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश, पाहा संपूर्ण यादी
Teachers Day 2022 : दरवर्षी प्रमाणे यंदाही शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षण मंत्रालयाकडून देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.
National Award to Teachers : आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन (Teachers Day) आहे. या निमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. आज राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे.
देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव
- कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई, महाराष्ट्र
- शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनाईक तांडा, बीड, महाराष्ट्र
- सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा पारगाव जोगेश्वरी, बीड, महाराष्ट्र
- अंजू दहिया, लेक्चरर, सरकारी एस सेक स्कूल बारवासनी, सोनीपत, हरियाणा
- युधवीर, शाळेचे जेबीटी प्रभारी, जीपीएस अनोगा, चंबा, हिमाचल प्रदेश
- वीरेंद्र कुमार, शिक्षक, उच्च माध्यमिक विद्यालय धरोग्रा, शिमला, हिमाचल प्रदेश
- हरप्रीत सिंह, मुख्याध्यापक, सरकारी प्राथमिक स्मार्ट स्कूल बिहला, बर्नाला, पंजाब
- अरुण कुमार गर्ग, प्राचार्य, GMSS दातेवास, मानसा, पंजाब
- रजनी शर्मा, शिक्षिका, निगम प्रतिभा विद्यालय, उत्तर पश्चिम दिल्ली
- कौस्तुभ चंद्र जोशी, प्राचार्य, SDS GIC प्रतापपूर-चकलुवा, नैनिताल, उत्तराखंड
- सीमा राणी, मुख्याध्यापिका, सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळा, जिल्हा - चंदीगड
- सुनीता, शिक्षिका, उच्च माध्यमिक विद्यालय बधीर बिकानेर, बिकानेर, राजस्थान
- दुर्गा राम मुवाल, शिक्षक, सरकारी उच्च प्राथमिक शाळा परगियापाडा, उदयपूर, राजस्थान
- मारिया मुरेना मिरांडा, प्राचार्य, सरकारी हायस्कूल मोरपिर्ला, गोवा
- उमेश भरतभाई वाला, शिक्षक, सेंट मेरी स्कूल राजकोट, राजकोट, गुजरात
- नीरज सक्सेना, शिक्षक, सरकारी प्राथमिक शाळा सालेगढ, रायसेन, मध्य प्रदेश
- ओम प्रकाश पाटीदार, व्याख्याते, शासन. उत्कृष्ट उच्च माध्यमिक विद्यालय शाजापूर, शाजापूर, मध्य प्रदेश
- ममता अहार, सहाय्यक शिक्षिका, सरकारी प्राथमिक शाळा पी सखाराम दुबे, रायपूर, छत्तीसगड
- ईश्वरचंद्र नायक, शिक्षक, सरकारी उच्च प्राथमिक शाळा कानापूर, पुरी, ओडिशा
- बुद्धदेव दत्ता, शिक्षक, जॉयपूर प्राथमिक शाळा, बांकुरा, पश्चिम बंगाल
- जाविद अहमद राथेर, प्राचार्य, सरकारी मुले उच्च माध्यमिक विद्यालय बारामुल्ला, बारामुला, जम्मू आणि काश्मीर
- मोहम्मद जबीर, शिक्षक, सरकारी माध्यमिक शाळा करित, कारगिल, लडाख
- खुर्शीद अहमद, शिक्षक, संमिश्र शाळा सहावा, देवरिया, उत्तर प्रदेश
- सौरभ सुमन, शिक्षक, ललित नारायण लक्ष्मी नारायण प्रोजेक्ट गर्ल्स हायस्कूल, सुपौल, बिहार
- निशी कुमारी, शिक्षिका, महादेव उच्च माध्यमिक विद्यालय, पाटणा, बिहार
- अमित कुमार, शिक्षक, जवाहर नवोदय विद्यालय थिओग, शिमला, हिमाचल प्रदेश
- सिद्धार्थ योन्झोन, प्राचार्य, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, ग्यालशिंग, सिक्कीम
- जैनस जेकब, शिक्षक, केंद्रीय विद्यालय त्रिशूर, त्रिशूर, केरळ
- जी पोनसंकारी, शिक्षक, केंद्रीय विद्यालय तुमकुरू, तुमाकुरू, कर्नाटक
- उमेश टीपी, शिक्षक, जीएलपीएस अमृतापुरा, चित्रदुर्ग, कर्नाटक
- मिमी योशी, मुख्य शिक्षिका, जीएमएस ऑफिसर्स हिल, कोहिमा, नागालँड
- नोंगमैथेम गौतम सिंग, शिक्षक, इस्टर्न आयडियल हायस्कूल, इंफाळ पूर्व, मणिपूर
- माला जिग्दल दोरजी, मुख्याध्यापक, मॉडर्न सीनियर सेकंडरी स्कूल, गंगटोक, सिक्कीम
- गामची टिमरे आर मारक, मुख्याध्यापक, एज्युसेरे उच्च माध्यमिक विद्यालय, मेघालय
- संतोष नाथ, कार्यवाहक मुख्याध्यापक, दक्षिण मिर्झापूर हायस्कूल, दक्षिण त्रिपुरा, त्रिपुरा
- मीनाक्षी गोस्वामी, मुख्याध्यापक, सीएनएस उच्च माध्यमिक विद्यालय, सोनितपूर, आसाम
- शिप्रा, शिक्षिका, टाटा वर्कर्स युनियन हायस्कूल कदम, सिंगबम, झारखंड
- रवी अरुणा, शिक्षक, अस्नरा जिल्हा परिषद हायस्कूल कानुरू, कृष्णा, आंध्र प्रदेश
- टीएन श्रीधर, शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल, महबूबनगर, तेलंगणा
- कंडाला रामय्या, शिक्षिका, झेडपी हायस्कूल अब्बापूर, मुलुगु, तेलंगणा
- सुनीता राव, प्राचार्य, दिल्ली पब्लिक स्कूल नचाराम, मेडचल मलकाजगिरी, तेलंगणा
- वंदना शाही, प्राचार्य, बीसीएम स्कूल, लुधियाना, पंजाब
- रामचंद्रन के, शिक्षक, पंचायत युनियन प्राथमिक शाळा केलंबल, रामनाथपुरम, तमिळनाडू
- अरविंदराजा डी, शिक्षक, आर्टचौना सौप्रया नायकर सरकारी हायस्कूल मुदलियारपेट, पद्दुचेरी
- प्रदीप नेगी, व्याख्याते, शासन. इंटर कॉलेज भेळ, हरद्वार, उत्तराखंड
- रंजन कुमार बिस्वास, अंदमान आणि निकोबार
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते - सोमनाथ वाळके
शिक्षक दिनाचा इतिहास (Teachers Day History)
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.