एक्स्प्लोर
Advertisement
नांदेड शिवसेना ही अशोक चव्हाणांची बी टीम: मुख्यमंत्री
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी उद्या मतदान होत आहे. त्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला.
नांदेड: नांदेडमधील शिवसेना हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची बी टीम आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी 11 तारखेला मतदान होत आहे. त्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर हल्ला चढवला.
अशोक चव्हाणांनी मुंबईत फ्लॅट घेतले, पण नांदेडमधील 50 हजारांहून अधिक लोकं बेघर आहेत. मुंबईत अशोक चव्हाणांचे फ्लॅट झाले पण नांदेडच्या गरिबांना झोपडी देखील मिळाली नाही. इतकी वर्ष अशोक चव्हाण सत्तेत होते, मग तरीही नांदेड इतकं मागास का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
नांदेडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना आणि काँग्रेसला सत्ता केवळ कमिशन खाण्यासाठी हवी आहे, असा प्रहार मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्यातील नदी प्रदूषण केवळ 10 % उद्योगामुळे होते, पण सांडपाण्यामुळे सर्वाधिक नदी प्रदूषित होते. नांदेडचे सांडपाणी शुद्धीकरण करून परळी औष्णिक केंद्राला नेणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
प्रताप चिखलीकर यांचं कौतुक
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर यांचं कौतुक केलं. प्रतापराव चिखलीकरांचं काम हे प्रतापराव गुजरांसारखं आहे, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेना आमदार प्रताप चिखलीकर हे भाजपचा प्रचार करत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र हे कार्यकर्ते अशोक चव्हाणांनी पाठवल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केला.
नांदेडमध्ये भाजपच जिंकणार, त्यामुळे काँग्रेसची पायाखालची वाळू सरकरली आहे, शिवाय शिवसेना दोन आकडेही गाठू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement