एक्स्प्लोर

गोसेखुर्द जागतिक जल पर्यटन प्रकल्प भंडाऱ्याचा विकासासाठी माईल स्टोन ठरणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास 

गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होत असलेला जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी माईल स्टोन ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलाय.

Bhandara News भंडाराराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर असून ते आज वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान, वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले आहे. त्यानंतर शहरातील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे.

त्यामुळे या महत्वकांशी प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे. अशातच भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर होत असलेला जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी माईल स्टोन ठरणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

भंडाऱ्याचा विकासासाठी जल पर्यटन प्रकल्प माईल स्टोन ठरणार

भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या या महत्वकांशी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. दरम्यान 102 कोटीच्या खर्चातून होत असलेल्या  या प्रकल्पामुळे पुढील टप्प्यांत मोठ्या प्रमाणात उद्योगनिर्मिती होणार आहे. या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांचे ही जीवनमान उंचावणार आहे. जागतिक दर्जाचा इथे जलपर्यटन होत असल्यानं भंडारा जागतिक नकाशावर पोहचणार आहे. तसेच सुमारे दहा हजार लोकांना या निमित्याने रोजगारची नवी संधी निर्माण होणार असल्याचा विश्वासही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी बोलताना व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखविले काळे झेंडे

दरम्यान, भंडाऱ्यातील या भूमिपूजनाच्या  कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध होताना देखील बघायला मिळाले आहे. गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा  प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये कोंबून नेलं. हा सर्व प्रकार भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडला. 

तर दुसरीकडे जागतिक जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सभा स्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखविले. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात हे काळे झेंडे दाखविण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
   
इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगितीTop 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावाPune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Embed widget