एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे माझी सारखी चेष्टा करतात, अजित पवारांकडे छगन भुजबळांची तक्रार; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

Chhagan Bhujbal At NCP Karyakarta Melava : जे आमच्यावर टीका करतात त्यांचा पक्ष निर्माण झाल्यावर जन्मही झाला नव्हता असा टोला छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. 

मुंबई: आम्ही सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे, भावनाविवश होऊन घेतलेला नाही, आम्हाला इकडे यायला तुम्ही परिस्थिती निर्माण केली असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) शरद पवार गटावर टीका केली. आम्ही आमचं बघतो, तुम्ही तुमचं बघा असा सल्लाही त्यांनी शरद पवार गटाला दिला. तर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे माझी सारखी चेष्टा करतात अशी गंमतीने तक्रारही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. अजित पवार गटाच्या एका कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. 

'मैं पुराणे जमानेका शिक्का हूँ, मुझे फेक ना देना, हो सकता हैं बुरे दीनो में में ही चल जाऊ' अशा शेरोशायरीच्या अंदाजात छगन भुजबळांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, "आम्ही पक्ष उभा केला, ध्वज उभा केला,  मी राज्याचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो. हल्ली आमच्यावर काही लोकं टीका करतात. त्यांना सांगणं आहे पक्ष स्थापन केला त्यावेळी तुमचा राजकीय जन्म होणार होता. आम्ही पक्ष वाढवला. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय."

तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो

छगन भुजबळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून संताप बाहेर पडत आहे. ते जेवढे संताप व्यक्त करतील तेवढी अपली शक्ती वाढणार आहे. आता आम्हाला तुम्ही विसरा, नवीन काम सुरू करा. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करत आहोत. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे आम्ही इथं आलो. तुम्ही ती परिस्थित उभी केली. प्रत्येक वेळा तुम्ही तळ्यात मळ्यात राहिला. आम्ही ठरवलं एकदाचं काय ते, तळ्यात नाहीतर मळ्यात जाऊ आणि आम्ही मळ्यात आलो.

उरला सुरला पक्ष संपवायला इतरांची गरज नाही

छगन भुजबळ म्हणाले की, "आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत दोन नंबरला आलो. आता तुम्ही सांगा बरं कितव्या नंबरला आहात? आता उरले सुरले देखील आमच्याकडे येतील. उरला सुरला पक्ष संपवायला बाकी लोकांची गरज नाही, हेच लोक पक्ष संपवून टाकतील."

निवडणूक आयोगात केस सुरू आहे. निर्णय आपल्याच बाजूने लागेल, कारण आपण सर्व पुरावे दिले आहेत. आपला पक्ष नवीन नाही. आपलं ध्येय तेच आहे. 'रात नहीं, ख्वाब बदलता हैं, मंजील वही हैं कारवां बदलता हैं, जजबात रखो जितने का... क्योंकी किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है'.

मराठा आरक्षणावर सर्वांची जी भूमिका तीच आपली भूमिका 

शाहू, फुले, आंबेडकर यांचाच विचार आपला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. मराठा आरक्षण अनुषंगाने मी जे बोलत आहे तेच सगळे बोलत आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलं होतं, आता कोर्टात याबाबत चर्चा सुरु आहे. दलित ओबीसी, आदिवासी यांच्या अधिकाराला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल. मी जो विषय मांडतो तो आज नाही मांडत, आधीपासून हे बोलत आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर तर मी शिवसेनेतून काँगेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत आलो. बाकी लोक काही बोलतील आपल्याला, आपलं काम करायचं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Markadwadi :निवडणूक कशावरही घ्या;मोहिते पाटलांच्या उमेदवाराला 55 गावातून कमीच मतं मिळणारRajan Naik Local Train : लोकलचा प्रवास, भजनाचा आनंद , राजन नाईक यांचा लोकलने प्रवासABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-Kurla Buss Accident Driver Beatnup : कुर्ला बस अपघातातील चालकाला जमावाची मारहाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Toss The Coin IPO : आयपीओ खुला होताच GMP वर बोलबाला,109 टक्के परताव्याचा अंदाज, पैसे दुप्पट होणार?
कमाईची मोठी संधी, आयपीओ खुला होताच GMP 109 टक्क्यांवर, पैसे दुप्पट होणार?
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, विद्यार्थ्यांना अर्ध्या शाळेतून सोडलं, बांगलादेश हिंसाचारप्रकरणी मराठवाड्यात रोष 
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत; चंद्रशेखर बावनकुळे यांची बोचरी टीका
Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर
Rohit Sharma : ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर टीम इंडियाच्या मदतीला, रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
सगळं मोफत वाटण्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा, मोफत लाभाच्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
एकाच कंपनीत खूप वर्ष काम करताय? ग्रॅच्यूटीचे हे नियम माहित असायलाच हवेत, नोकरीत 5 वर्षे पूर्ण नसतील तर...
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
पुष्पा-2 मध्ये अल्लू अर्जुनलाही खाऊन टाकणारा व्हिलन तारक पोनप्पा चक्क कृणाल पांड्याची कार्बन कॉपी, फॅन्सही गोंधळले!
Embed widget