एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याची दिली गॅरंटी!

Chhagan Bhujbal : समता परिषदेच्या बैठकीतून मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत तब्येतीची विचारपूस केली. 

Chhagan Bhujbal मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची (Samata Parishad) राज्यस्तरीय बैठक बोलावली.  वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलात ही बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे (Mangesh Sasane) आणि लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 

मराठा समाजाला ओबीसीतून (Maratha Reservation) आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे तर मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचे पुण्यात उपोषण सुरु आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले जात आहे. चार-पाच दिवसांपासून उपोषण सुरु असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे. 

समता परिषद आंदोलकांच्या पाठीशी

या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या बैठकीत अ‍ॅड. मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती घेतली. या दोघांशीही भुजबळांनी फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद पाठीशी असल्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आले. दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंती भुजबळांनी यावेळी केली.  ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको, या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत, अशीही चर्चा फोनवरून झाल्याची माहिती मिळत आहे. 

भुजबळ काय निर्णय घेणार?

मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. नाशिक लोकसभेतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी पहिल्यांदा दिसून आली. त्यानंतर भुजबळांकडून महायुतीला अडचण निर्माण होईल, अशी वक्तव्य अनेकदा करण्यात आली. अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. यानंतर पुन्हा एकदा भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता भुजबळांनी समता परिषदेची मुंबईत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर भुजबळ काही घोषणा करणार का? भुजबळ कुठला मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Pankaja Munde: सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी; लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे गांभीर्याने पाहावे; पंकजा मुंडेंचा रोख कोणाकडे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget