ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; तुमच्या जिल्ह्यातील उमेदवार कुठल्या प्रवर्गाचा, यादी समोर https://tinyurl.com/msk2umcf तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळांचं आव्हान https://tinyurl.com/5h9xe47p
2. मनसेचे बाळा नांदगावकर अन् संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले https://tinyurl.com/mvr2bwft तुमचा नगरसेवक खून करून फरार होतो, हे गृहमंत्र्यांना माहित नसेल तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून नालायक; संजय राऊतांची नाशिकमधून घणाघाती टीका https://tinyurl.com/ytcvnjrf
3. आता पहलगाममध्ये रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट खेळता? भारत-पाक सामन्यावरुन उद्धव ठाकरेंचा संताप, शिवसैनिकांना आदेश, 14 सप्टेंबरला आंदोलन करा https://tinyurl.com/yp4rens2 मुंबईतील प्रभादेवीत ठाकरे VS शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; सुशोभीकरणाच्या कामावरुन पडली वादाची ठिणगी, अदखलपात्र गुन्हा दाखल https://tinyurl.com/yzwmfz95
4. भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; मंत्री छगन भुजबळ वांगदरी गावात, ओबीसी आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या रिक्षाचालक कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन, आत्महत्या करू नका https://tinyurl.com/mv2e6kpx हा विसरभोळा मंत्री, याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, मराठा-ओबीसी आरक्षणावरुन जुंपली https://tinyurl.com/49t2mfrf
5. पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम; 'इथेनॉल'वरून होत असलेल्या टीकेवर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा खुलासा https://tinyurl.com/vm8mfrxs सरन्यायाधीश म्हणाले, कोणीही कायद्याच्या वर नाही, राज्यपालांनी विधेयक रोखल्यास न्यायालय निष्क्रिय बसणार नाही; राज्यपालांच्या मंजुरीसाठी अंतिम मुदत मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी पूर्ण, निर्णय राखून ठेवला https://tinyurl.com/38m3ajn2
6. रत्नागिरीत एसीबीची मोठी कारवाई, लेखा परीक्षण कार्यालयातील क्लास वन अधिकाऱ्यासह शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं https://tinyurl.com/m35uevzt कणकवली हादरली, दारुड्या मुलाने आईच्या डोक्यात कोयता घातला अन् सपासप वार; वृद्ध महिलेच्या मृत्युने हळहळ https://tinyurl.com/56u2naze
7. नाशिकमध्ये भीषण अपघात, मजुरांची पिकअप अन् कारची जोरदार धडक, तीन ठार, 10 जण जखमी https://tinyurl.com/cx985nhe धुळे हादरलं, माजी स्थायी समिती सभापतींच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसात घेतला गळफास https://tinyurl.com/yvfwb82d
8. पती नपुंसक, नातवासाठी सासऱ्याची सुनेकडे सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुण्य नगरी हादरली https://tinyurl.com/kkwpfucr मैत्रीणीने मैत्री तोडली अन् त्याच्यासोबत बोलायला लागली; रागाच्या भरात मित्राच्या मदतीनं केला धारदार शस्त्राने हल्ला, पुण्यातील घटना, CCTV समोर https://tinyurl.com/cuwuwwxd
9. पुढील 4 दिवस वादळी पावसाचे, पुण्यासह कोकण मराठवाड्यातही हायअलर्ट; गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी https://tinyurl.com/44sabute
10. भारत-पाकिस्तान सामन्याची 50 टक्के तिकिटं शिल्लक, कोणीच खरेदी करेना; विराट कोहली अन् रोहित शर्मा नसल्याने चाहत्यांनी फिरवली पाठ, आकाश चोप्राचा दावा https://tinyurl.com/2u6yjphz भारतात खेळाडूंचे घरं जाळले जातात, काही खेळाडूंना 'हिंदुस्तानी' असल्याचं सिद्ध करावं लागतंय; IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला https://tinyurl.com/bdfk3k4n
*एबीपी माझा स्पेशल*
पुणे, पश्चिम महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र कसं काढाल? कोणती कागदपत्र लागतील? जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/y4azchwh
म्हाडाची 6168 घरांची सोडत; पुणे, पिंपरीमध्ये 3 हजार घरे, 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत https://tinyurl.com/vp3n22w6
वडील बंडू आंदेकर अन् मुलगी संजीवनी कोमकर यांच्यातील वाद काय होता? कल्याणी कोमकरने सांगितला प्रॉपर्टीचा वाद https://tinyurl.com/2398s6sn
























