एक्स्प्लोर

याला नेपाळ, नागालँडकडे सोडा; जरांगे पाटलांचा पुन्हा छगन भुजबळांवर बोचरा पलटवार, आरक्षणावरुन जुंपली

तू 32 टक्के खातो असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे ते आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसींनी हे समजून घ्यावे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

जालना : ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी लातूर जिल्ह्यातील वांगदरी गावात जाऊन ओबीसी आरक्षणाच्या लढाईत आपला जीव दिलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी, ओबीसी बांधवांना (OBC) आवाहन करत कुणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये, आधी आम्ही संपू, नंतर तुम्ही काय करायचे ते करा, असे म्हटले. तसेच, आरक्षणाच्या लढाईसाठी बलिदान देण्याची वेळ आपल्या बांधवावार आल्याचेही भुजबळ यांनी म्हटले होते. आता, छगन भुजबळांच्या लातूर दौऱ्यासंदर्भात बोलताना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुझ्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलं, ्याच्या ध्यानातच काही राहिना झालंय, आता हा विसरभोळा मंत्री झाला आहे. तो आता अंधश्रद्धा बाळगत आहे, असा पलटवार केला. तसेच, ह्याला तिकडं नेपाळ, नागालँडमध्ये सोडायला हवं, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

तू 32 टक्के खातो असा मंत्री देशात आहे का कुणी? आतापर्यंत याने आमचं आरक्षण खाल्लं आहे ते आम्ही परत घेत आहोत, गरीब ओबीसीनी हे समजून घ्यावे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षण रद्द करायचं आहे का? तू इतके दिवस खात होता ते रद्द करायचं आहे का? तू प्रगत झाला आहे. तू ते आरक्षण सोड ना. तुझं अजूनही पोट भरत नाही का? भरत्या, शिक्षण, सगळं यानेच खाल्लं आहे. राजकारणापायी हे ओबीसींना उलटे समजाऊन सांगत आहे. याच ऐकू नका, हा मेटाकुटीला आला आहे. डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे, याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं.

नेपाळ, नागालँडला सोडायलं हवं

मुंबईत येऊन हैदोस घातला असे भुजबळ यांनी म्हटल्याचा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारण्यात आला होता. त्यावर, याला देवाने अक्कल दिली असती तर बरं झालं असतं, मुंबईत मराठ्यांची पोर गेल. महाराष्ट्राला एक संस्कृती दिसली, मुंबईचे खरे मालक ह पोर होत, तिथले लोक पाहुणे आहेत. ह्यो इथं शोभत नाही,्या जनावराला नेपाळ, इकडे तिकडे सोडायला हवं, ह्याला नागालँड, इंग्लड शा ठिकाणी सोडायला पाहिजे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पलटवार केला. तसेच, महाज्योतला यापूर्वी हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? सारथीला आता कुठे यायला लागले आहेत. वेडा वाकडा जीआर याने 1994 साली काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आतापर्यत मिळवलं आहे, असेही पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Embed widget