एक्स्प्लोर
Nashik Shiv Sena UBT MNS Morcha : बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
Nashik Shiv Sena UBT MNS Morcha : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसेसह ठाकरे गटाचे बडे नेते सहभागी झाले आहेत.
Nashik Shiv Sena UBT MNS Morcha
1/10

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिक येथे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
2/10

या मोर्चात मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
3/10

बाळा नांदगावकर हे संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
4/10

मोर्चात मनसैनिक आणि शिवसैनिकांनी हातात काळे झेंडे घेऊन सरकार विरोधात निषेध नोंदवला.
5/10

वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
6/10

भ्रष्टाचार, गुन्हेगारी, कोयता गँग, जुगार, एमडी ड्रग्स अवैध धंदे असे विविध प्रात्यक्षिक कार्यकर्त्यांकडून मोर्चात सादर करण्यात आले.
7/10

नाशिकनंतर असाच मोर्चा पुण्यात काढला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
8/10

नाशिकमध्ये नेपाळसारखाच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
9/10

या मोर्चात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
10/10

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता सभा घेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
Published at : 12 Sep 2025 01:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत
महाराष्ट्र
























