एक्स्प्लोर
CBSE विरुद्ध SSC, यंदाही अकरावी प्रवेशाला घमासान होणार
मुंबई : दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनात कॉलेजच्या अॅडमिशनची भीती असते. त्यातच सीबीएसई आणि एसएससीच्या मुलांमध्ये रंगणारी काटे की टक्कर हा एक महत्वाचा मुद्दा येतो.
यंदाही सीबीएससीच्या टक्क्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाच्या वेळी धांदल उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसएससीचा निकाल लागल्यावर अकरावीच्या प्रवेशासाठी घमासान सुरु होणार आहे. कारण सीबीएसईच्या भरघोस गुणांसमोर एसएससीच्या मुलांचं मार्कशीट थोडं हलकं असतं. त्यामुळे यंदासुद्धा सीबीएसई विरुद्ध एसएससी असं चित्र पाहायला मिळणार आहे.
विषय निवडीचं स्वातंत्र्य, व्यवसायभिमुख शिक्षण आणि मूल्यमापन पद्धती या सगळ्यांमुळे सीबीएसईच्या गुणांचा टक्का वरचढ ठरतो.
एसएससीमध्ये मात्र भिन्न परीक्षा पद्धती, मूल्यमापनाचे भिन्न निकष आणि स्पर्धा मात्र एकच अशा विचित्र अवस्थेला विद्यार्थी आणि पालकांना सामोरं जावं लागतं.
सीबीएसई आणि एसएससीवरुन होणाऱ्या घोळावर तज्ज्ञांनी शंभर पर्याय सुचवले आहेत. मात्र सरकार आणि शैक्षणिक धोरण कायम बदलत असल्याने विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालकांचीही फरफट होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement