एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरात कार मेकॅनिककडून चक्क हेलिकॉप्टर दुरुस्ती
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांच्या कोल्हापुरातल्या बंगल्यावरच्या हेलिपॅडवर पाहुण्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, पण परतीच्या प्रवासात हेलिकॉप्टर सुरुच होईना... संजय पाटील यांनी कंपनीला फोन केला, पण मेकॅनिक पोहोचण्यासाठी दोन दिवस लागणार होते. अशावेळी मेकॅनिक मोमीन धावून आला.
इम्तियाज मोमीन यांच्या गॅरेजमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु होतं. पण तितक्यात काही मंडळी आली आणि हेलिकॉप्टर बंद पडलं आहे, दुरुस्त कराल का अशी विचारणा केली. सुरुवातीला कुणी तरी थट्टा करत असेल असं वाटलं. पण नंतर डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निवासस्थानी इम्तियाज पोहोचले आणि समोर दिसलं ते भलं मोठं हेलिकॉप्टर.
याआधी कधीही हेलिकॉप्टर दुरुस्तच काय जवळूनही बघितलं नव्हतं, तरीही इम्तियाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पायलटशी चर्चा केली आणि थेट हेलिकॉप्टर दुरुस्तीला हात घातला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर पायलटनं टेस्ट फ्लाय घेतली आणि हेलिकॉप्टर चक्क सुरु झालं.
सगळी खात्री झाली... हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज झालं... आणि अर्ध्या तासात हेलिकॉप्टरनं आकाशात भरारी घेतली... याआधी या अवलिया मेकॅनिकनं चक्क पाण्यावर चालणारी कार कोल्हापुरातल्या तलावात उतरवली होती. कोल्हापूरमध्ये काहीही शक्य आहे, असं म्हणतात ते उगाच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement