एक्स्प्लोर
Advertisement
विमानतळाचा विकासच नाही, कॅगचे ताशेरे, 'उडान' लांबणीवर?
मुंबई: देशतील छोटी शहरं, जिल्हे विमानसेवेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडान योजना जाहीर केली आहे. मात्र राज्यातील विमानतळ विकासाकडे राज्य सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे ताशेरे कॅगने आपल्या अहवाला ओढले आहेत.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अर्थात एमएडीसीला विमानतळ विकासासाठी दिलेला निधी वापरला नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. तसेच काही ठिकाणी अनावश्यक खर्च झाल्याचेही नमूद केले आहे.
कॅगने आपल्या अहवालात पाच विमानतळ विकासाबाबत माहिती दिली असून, या विमानतळांचा विकास करण्यासाठी एमएडीसीने विशेष काही केले नसल्याचे म्हटले आहे.
जमीन संपादनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र विमानतळांचा विकास केला नाही, असा निष्कर्षही कॅगने आपल्या अहवालात मांडला आहे.
केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात विमानसेवेने जोडण्यासाठी राज्यातील ज्या विमानतळांचा समावेश केला आहे त्या विमानतळांचाही विकास अद्याप झाला नसल्याचे या अहालावरून स्पष्ट होते.
अमरावती, सोलापूर, शिर्डी अशा विमानतळांच्या विकासासाठी जमीन संपादित करूनही या विमानतळांचा विकास झालेला नसल्याचं कॅग अहवालात दिसून येतं.
स्वस्त ‘उडाण‘, हवाई प्रवास अडीच हजारात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी उडान योजना लाँच झाली असून, 30 मार्चला या योजनेतील 45 मार्ग जाहीर झाले. महत्त्वाचं म्हणजे या योजनेत महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश असून, या मार्गावर अवघ्या अडीच हजार रुपयात प्रवास करता येणार आहे. नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली. ‘उडान’ या योजनेनुसार एक तासाचा हवाईप्रवास अवघ्या अडीच हजार रुपयात करता येईल. ‘उडाण’च्या नियम व अटी या योजनेनुसार या मार्गावरील विमानातील एकूण सीट्सच्या 50 टक्के सीट या अडीच हजार रुपयांच्या असतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल. महाराष्ट्रातील हवाई मार्ग- नांदेड- मुंबई – (जून- 2017)
- नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
कोल्हापूर - मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात!
स्वस्त ‘उडाण‘, हवाई प्रवास अडीच हजारात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement