एक्स्प्लोर

'मी तुमच्यासोबत संबंध प्रस्थापित करु इच्छिते' म्हणत माजी सरपंचाला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! बुलढाण्यातील प्रकार, महिलेसह सहा जणांना बेड्या

Buldhana News Updates : बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील सरपंचाला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या सरपंचाला एका महिलेने फोन करून एका निर्जन स्थळी बोलावून घेतलं.

Buldhana Crime News : सध्या हनी ट्रॅपचे (honey trap)प्रकार वाढत चालले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून हनी ट्रॅप करत पैशांची मागणी करण्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana News Updates) समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या माजी सरपंचाला एका महिलेने फोन करून एका निर्जन स्थळी बोलावून घेतलं. यानंतर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या इतर पाच जणांना सरपंचाला मारहाण केली. शिवाय आम्ही तुझे आता व्हिडीओ काढले असून ते समाज माध्यमात व्हायरल करु असं सांगत आताच एक लाख रुपये दे, असा दम दिला. सोबतच यावेळी सरपंचाच्या जवळील पाच हजार रुपये घेतले आणि पळून गेले. 

या घटनेनंतर सरपंचाने बुलढाणा शहर पोलीसात तक्रार दाखल केली. सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरून काही तासातच पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे अलीकडे बुलढाणा परिसरात असे प्रकार वाढले असून या प्रकाराला बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील एका गावच्या माजी सरपंचाने ही तक्रार  शहर पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांना एका महिलेने फोन द्वारे सांगितले की, मी तुमच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करु इच्छिते तुम्ही लवकर या. मग काय माजी सरपंचांनी तात्काळ सांगितलेल्या ठिकाणी म्हणजेच शहरातील निर्जन अशा डी एड कॉलेज परिसर गाठला. एका टीन शेडमध्ये त्यांना बोलावण्यात आले. सदर महिला यावेळी निर्वस्त्र झाली. हे पाहून माजी सरपंचांनी देखील तयारी केली. आणि नंतर खरा खेळ सुरू झाला. तिथे दडून बसलेल्या चार ते पाच युवकांनी या दोघांना तिथेच घेरले.

त्यांनी माजी सरपंचांना म्हटलं की,  आम्ही तुमचे व्हिडिओ काढलेले आहेत. तुम्ही जर आम्हाला एक लाख रुपये दिले नाहीत तर हे व्हिडीओ आम्ही सोशल मीडियावर व्हायरल करू. तसेच त्यांच्या जवळ असलेले नगदी साडे पाच हजार रुपये काढून घेतले. त्यांना मारहाण करून तिथून पळून गेले. पोलिसांच्या डीपी पथकातील टीमने अवघ्या काही तासातच या 5 आरोपीसह 23 वर्षीय सदर महिलेला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कृष्णा पवार , अजय  वीरशीद,  रुपेश सोनवणे, संतोष जाधव यांच्यासह एक 17 वर्षीय युवक आणि 23 वर्षीय महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Pune Crime News: सोशल मीडियावरची मैत्री भोवली! लैंगिक अत्याचार केल्याची धमकी देत तरुणीने उकळले तब्बल 67 लाख

Ichalkaranji Honey Trap : फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यापाऱ्यावर हनी ट्रॅप, दोन महिलांसह 5 जणांवर गुन्हा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Embed widget