Ichalkaranji Honey Trap : फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यापाऱ्यावर हनी ट्रॅप, दोन महिलांसह 5 जणांवर गुन्हा
Ichalkaranji Honey Trap : फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यापाऱ्याला हनी ट्रॅप करून दीड लाखाला गंडा घालणाऱ्या 2 महिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ichalkaranji Honey Trap : फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून व्यापाऱ्याला हनी ट्रॅप करून दीड लाखाला गंडा घालणाऱ्या 2 महिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
शिवानंद हांजिगे, बबलू हांजिगे (रा. शहापूर, इचलकरंजी), रियाज मुल्ला (रा. सोलगे मळा, इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने फेसबुकच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याशी ओळख झाल्यानंतर त्याला प्रेमाचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली.
गेल्या वर्षभरापासून त्या व्यापाऱ्याची त्या महिलेकडून लूट सुरु होती. संबंधित महिलेने एकदा पीडित व्यापाऱ्याला हातकणंगलेमध्ये एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावल्यानंतर त्या ठिकाणी संशयित आरोपी सुद्धा पोहोचले. त्यानंतर या सर्वांनी त्यांना मारहाण करत 7 लाख रुपयांची मागणी केली.
मात्र, 4 लाखांवर तडजोड करून 2 लाख व्यापाऱ्याकडून देण्यात आले होते.उर्वरित दोन लाखांसाठी सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने वैतागून व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Shivaji University election 2022 : शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु
- Rajendra patil yadravkar vs shivsena : यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांच्या राड्यानंतर 200 जणांवर गुन्हे दाखल
- Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा
- Rajendra Patil Yadravkar : मी लेचापेचा नाही! जयसिंगपुरातील तुफानी राड्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकरांचा इशारा