एक्स्प्लोर

Breaking News LIVE : प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

Breaking News LIVE Updates, 19 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Breaking News LIVE : प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

Background

College Reopen : कॉलेज कॅम्पस गजबजणार, राज्यात आजपासून महाविद्यालये सुरू

कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये  आजपासून सुरू होणार आहे.  20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद  विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. 

सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई, दोन महिला अटेकत, काय आहे सेक्स टूरिझम 
मुंबई : मुंबई क्राइम ब्रांचनं एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं.  मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला अशी महिती मिळाली होती की, 2020 मध्ये वेश्या व्यवसायात अटक केलेली एक महिला आपल्या पार्टनरसह मिळून एका वेगळ्या प्रकारे रॅकेट चालवत आहे. यानंतर मुंबई एअरपोर्टवर क्राइम ब्रांचच्या टीमनं ट्रॅप लावत दोन महिलांना अटक केलं आणि अन्य दोन महिला ज्यांना या व्यवसायात ढकललं जात होतं त्यांना ताब्यात घेत शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं आहे.  

काय होती मोडस ऑपरेंडी?

ही लोकं ग्राहक शोधायची. त्यांना ग्राहक मिळला आणि डील फायनल झाली की, महिलांसोबत भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पोहोचवायचे. यात गोवा या लोकांची सर्वाधिक पसंती होती.  संबंधित रॅकेट चालवणारे लोक ग्राहकांना आधी मुलींचे फोटो पाठवायचे. मुलगी पसंत आल्यानंतर ग्राहकांना गोवा किंवा ठरलेल्या ठिकाणापर्यंत फ्लाईटचं स्वत:चं तिकिट बुक करावं लागायचं. हे लोक ग्राहकांकडून दोन दिवसांचे 50 हजार रुपये घ्यायचे, जे एक्स्क्लुझिव्ह सेक्ससाठी घेतले जायचे.  अटक केलेले आरोपी त्या मुलींकडून 20 टक्के कमिशन घ्यायचे. ज्यानंतर ग्राहक त्यानं पसंत केलेल्या मुलीला घेऊन दोन दिवसांसाठी गोव्याला जायचे आणि नंतर मुंबईत परतायचे. 

कसं पकडलं रॅकेट

क्राइम ब्रांचनं या प्रकरणात दोन महिलांना अटक केलं आहे. यातील एकीचं नाव आबरुन अमजद खान उर्फ सारा तर दुसरीचं नाव वर्षा दयालाल असं आहे. क्राईम ब्रांचनं सांगितलं की, ज्यावेळी याबाबत माहिती मिळाली त्यावेळी एक डुप्लिकेट ग्राहक तयार केला ज्यानं महिलांशी संपर्क केला आणि त्यांचा विश्वास जिंकण्यानंतर मुलींची मागणी केली.  त्यानंतर गोव्याची तिकिटं देखील बुक केली. यानंतर ज्यावेळी त्या महिला एअरपोर्टवर पोहोचल्या त्यावेळी PSI स्वप्निल काळे आणि त्यांच्या टीमनं तीन महिलांना अडवलं आणि चौकशीनंतर ताब्यात घेतलं.  चौकशीनंतर माहिती मिळाली की, यांची चौथी साथीदार असलेल्या महिलेनं बोर्डिंग पास घेतला आहे. त्यानंतर पीआय एम श्रीधनकर आणि पीआय प्रिया थोरात सीआयएसएफ यांच्या मदतीनं त्या महिलेला एअरपोर्टमधून बाहेर काढत ताब्यात घेतलं. त्यावेळी तिनं या प्रकरणाची कबुली दिली. त्या महिलेनं सांगितलं की, मुंबईत पोलिसांची छापेमारी खूप वाढली आहे. त्यामुळं मुलींना काम करायला भीती वाटते. त्यामुळं गोवा किंवा अन्य पर्यटनस्थळांवर फिरायला पाठवलं जायचं, जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये.  

19:19 PM (IST)  •  20 Oct 2021

प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन सावंत यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट  घेतली. वर्षा बंगल्यावर सावंत आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा  झाली. सावंत आणि मुख्यमंत्र्यामधल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघांमध्ये  10 मिनिटं चर्चा झाली.

14:49 PM (IST)  •  20 Oct 2021

आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचाचा जामीन अर्ज फेटाळला

13:23 PM (IST)  •  20 Oct 2021

इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षा निकाल जाहीर,पुरवणी परीक्षेचा राज्याचा निकाल 27.31

इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षा निकाल जाहीर झाला आहे

इयत्ता बारावी बोर्ड पुरवणी परीक्षा -
एकूण 12160 परीक्षेस प्रविष्ट झाले होते 
त्यातील 3322 विद्यार्थी या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून
बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा राज्याचा निकाल 27.31 आहे

दहावी बोर्ड पुरवणी परीक्षा
एकूण 10477 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातील 3053 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत 
राज्याचा दहावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा निकाल 29.14 आहे

12:30 PM (IST)  •  20 Oct 2021

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कसं जगायचं असा सवाल उपस्थित करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत देखील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या जवळच असणाऱ्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादीचे युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. जोपर्यंत ही दरवाढ कमी होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करत राहणार अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली आहे. 

12:19 PM (IST)  •  20 Oct 2021

नाशिक : फटाके विक्रेत्यांना दिलासा, पालिका महासभेआधीच फटाके विक्री बंदी मागे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं सुटला तिढा

नाशिक : फटाके विक्रेत्यांना दिलासा, पालिका महासभेआधीच फटाके विक्री बंदी मागे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं सुटला तिढा
- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यांना दिले होते निर्देश
- मात्र,भुजबळ यांनी साधला थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यासोबत संवाद
- अखेर उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात होणार फटाके विक्री

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Municipal Corporation Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणारMaitreya Dadashree : दादाश्रीजी मैत्रीबोध :  02 Feb 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM TOP Headlines  : सकाळी ८ च्या हेडलाईन्स :  02 February 2024 : ABP MajhaSanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zakia Jafri : गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
गुजरात दंगलीत गुलबर्ग सोसायटीत जिवंत जळालेल्या माजी खासदार एहसान जाफरींच्या पत्नी झाकिया यांचे निधन, न्यायासाठी शेवटपर्यंत 'सर्वोच्च' लढा
Sanjay Raut : ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, शिरसाटांना 'महान' म्हणत राऊतांचा खोचक टोला
Satara: शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना, कडेकोट बंदोबस्त
शिवकालीन वाघनखांचा सातारा मुक्काम संपला! ऐतिहासिक वारसा नागपूरकडे रवाना
Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?
Gadchiroli: धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
धक्कादायक! नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं
Tax Regime: 12 लाखांच्या निर्णयानं नव्या कररचनेला अच्छे दिन, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला फायदेशीर, जाणून घ्या  
सगळीकडे नव्या कररचनेची जोरदार चर्चा, जुनी कररचना 'या' उत्पन्न गटाला अजूनही फायदेशीर
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
अर्थसंकल्पात 12 लाख करमुक्तीचा डाव खेळला, पण देशातील भीषण बेरोजगारीवर चकार शब्द नाही! सामान्यांच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष, शिक्षणावरही हात आखडला
Dhananjay Deshmukh : नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर
नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; संतोष देशमुखांचे भाऊ आज भगवानगड गाठणार, थेट पुरावे करणार सादर
Embed widget