Breaking News LIVE : एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा
Breaking News LIVE Updates, 12 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Breaking News LIVE : एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा Breaking News LIVE : एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/03/f7063f3c82174c38d6296ebd3822aa6e_original.jpeg)
Background
राज्यात मंगळवारी 40, 956 रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात मंगळवारी (11 मे) 71 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर नवीन 40 हजार 956 रुग्णांचे निदान झाले आहे. सोमवारीही (10 मे) राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 87.67 टक्के झाला आहे. तर राज्यात काल 793 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
मराठा आरक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील होते. आम्ही आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी भेट घेतली. भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
अरबी समुद्रात 14 ते 15 मेच्या आसपास चक्रीवादळ येणार? किनारपट्टी भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा
कोरोना संकट सुरु असतानाच आता आणखी एक नैसर्गिक संटक देशावर आदळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम सरकण्याची शक्यता आहे. 14 मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी सूचना दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकणातील आरोपी एपीआय सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ
मुंबईतील अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणातील चौकशीचा सामना करत असलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना मंगळवारी महाराष्ट्र पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. हा आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्तांनी जारी केला आहे. अँटालिया स्फोटकं आणि मनसूख हिरण हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं या दोघांना 19 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
राज्यमंत्री बच्चू कडू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका....
पंतप्रधान म्हणून जी भूमिका बजावायला हवी होती ती त्यांनी बजावली नाही त्यामुळे ही आपत्ती आली आहे... ती देशासोबत आता राज्यावर येऊन पडली आहे... त्यांनी देशात योग्य नियोजन केले असते तर आज हे दिवस पाहायला मिळाले नसते... बच्चू कडूंची पंतप्रधान मोदींवर टीका
लसीच्या तुटवड्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका... फडणवीस हे राज्याचे नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत... त्यांनी केंद्रात जाऊन लस जास्त द्या किंवा इतर साहित्य द्या अशी मागणी केली का ? राज्य सरकारवर टीका टिपण्णी करण्यापेक्षा केंद्रातून काय आणले याचे उदाहरण द्यावे आणि बोलावे...
एक कोटी लसींसाठी मुंबई महापालिकेकडून जागतिक निविदा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरासाठी 1 कोटी लसींची जागतिक निविदा काढली आहे. मुंबई महानगरपालिकेचे 60 ते 90 दिवसांच्या आत लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची माहिती.
सोलापुरात शुक्रवारी रमजान ईद साजरी केली जाणार
सोलापुरात शुक्रवारी साजरी केली जाणार रमजान ईद, आज चंद्रदर्शन न झाल्याने उद्या 30 रोजे पूर्ण करून शुक्रवारी साजरी होणार ईद, सोलापूर शहर काझी अब्दुरराफे अब्दुस सलाम यांची माहिती, यंदा साधेपणाने ईद साजरी करण्याचे मुस्लिम धर्मगुरूंचे आवाहन
राज्यात आज 46 हजार 781 नवीन रुग्णांचे निदान तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज 46 हजार 781 नवीन रुग्णांचे निदान तर 58,805 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात 46781 नवीन रुग्णांचे निदान, आज 58805 रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात 46781 नवीन रुग्णांचे निदान, आज 58805 रुग्ण बरे होऊन घरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)