(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : पंचनामा झाल्यानंतर पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करणार
Breaking News LIVE Updates, 28 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
राज्यात काल 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 58 हजार 751 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के आहे.
राज्यात काल 254 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 26 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 82 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (53), यवतमाळ (9), गोंदिया (53), गडचिरोली (57), चंद्रपूर (69) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हिंगोली जिल्ह्यात काल एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 771 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76, 057 (13.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,98,933 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
New Karnataka CM : बसवराज बोम्मई कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोम्मई यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहे. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या जवळचे आणि लिंगायत समाजाचे आहे. मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर बोम्मई म्हणाले, ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे गरीबांसाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला मुख्यमंत्री पद मिळेल याचा विचार कधी केला नव्हता. परंतु मला माझ्या कष्टावर पुर्ण विश्वास होता आणि आज त्याचे फळ मला मिळाले.
मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या बैठकीत बी. एस. येडियुरप्पा, भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी काल (26 जुलै) मुख्यमंत्रीपदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. कार्यकाळा पूर्ण केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपविला.
नगरविकास खात्याची मोठी घोषणा
महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायती क आणि ड वर्गांत ज्यांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे त्यांना 50 लाखांची मदत केली जाणार आहे. नगरविकास खात्याची मोठी घोषणा केली आहे.
पंचनामा झाल्यानंतर पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करणार
पंचनामा झाल्यानंतर पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करणार आहे. सध्या एनडीआरएफच्या निकषानुसार तात्काळ मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. 31 तारखेपर्यंत पावसाचा हायलर्ट आहे त्यामुळे किती नुकसान आहे याचा अंदाज घेऊन पॅकेज जाहीर करणार आहे. आतापर्यंत 3 हजार कोटी रुपयांच नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. अजून ही नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या नुकसानीचा अंदाज आलेला नाही त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर पॅकेज ची घोषणा केली जाणार
जयंत पाटील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल
कॅबिनेट बैठकीत असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणीसाठी ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रिज कॅण्डी रुग्णालयात तातडीनं ईसीजी करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी ब्रीज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयंत पाटीलांसोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी
शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार अध्यादेश काढणार आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प
अतिवृष्टीमुळे कोकणात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाडमध्ये एनडीआरएफच बेस कॅम्प उभारणार आहे.
या कॅम्पसाठी महाडमधील दूध योजनेची 2.57 हेक्टर जमीन राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. याआधी एनडीआरएफची टीम पुणे आणि मुंबईमध्ये तैनात असायची. कोकणातील भविष्यातील धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय आहे.