(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दाल मे कुछ काला है' मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी उद्या ( 3 डिसेंबर) बॅलेट पेपरवर (Balet Paper) मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इथं जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. याच मुद्यावरुन रोहित पवारांनी टीका केलीय.
Rohit Pawar : ईव्हीएम (EVM) मशीनवर शंका घेत माळशिरस (Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी उद्या ( मंगळवार 3 डिसेंबर) बॅलेट पेपरवर (Balet Paper) मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावली. तरीदेखील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. मारकडवाडी (Markadwadi) इथं जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. याच मुद्यावरुन शरद पवार गटाच आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे 'दाल मे कुछ काला है' असेच म्हणावे लागेल असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
माळशिरस मतदारसंघांतील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाचा घेतलेला निर्णय घेतला आहे. लोकशाहीसाठी हा अत्यंत आशादायी निर्णय असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे. उद्याची ही घडामोड ‘दूध का दूध-पाणी का पाणी’ केल्याशिवाय राहणार नाही असे रोहित पवार म्हणाले. दुसरीकडे हे सर्व होत असताना ही मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेली दडपशाही म्हणजे ‘दाल मे कुछ काला है’ असेच म्हणावे लागेल अशी टीका देखील रोहित पवारांनी केलीय. पण सरकार कितीही दडपशाही करत असले तरी लोकशाही वाचवण्याच्या या लढाईत मारकडवाडी गावासोबत आणि आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यासोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत असे रोहित पवार म्हणाले.
EVM घोटाळा करून भाजपला जिथे 80 टक्के मते मिळाली, आव्हाडांचा टोला
दरम्यान, याच मुद्यावरुन शरद पवार गटाचे आमादर आणि गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर टीका केलीय. EVM घोटाळा करून भाजपला जिथे 80 टक्के मते मिळाली त्या माळशिरसधील मारकडवाडीत उद्या गावकरी स्वतः सगळी यंत्रणा उभी करून बॅलेट पेपरवर मतदान घेत आहेत. हे बॅलेट पेपरवरील मतदान होऊ नये म्हणून जमावबंदी लागू केलीय व पोलीस बंदोबस्त लावला आहे.
का….?
कश्यासाठी….?
असे सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.
गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच, उत्तम जानकरांचा इशारा
गाव एकत्रित येऊन त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर जर मतदान घेत असेल तर शासनाला त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल करत मंगळवारी कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थ मारकडवाडी येथे मतदान करणारच असा इशारा नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांनी दिला. प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच असंही ते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध करत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडीमध्ये पोहोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या: