Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 12645 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 82 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (53), यवतमाळ (9), गोंदिया (53), गडचिरोली (57), चंद्रपूर (69) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबई : राज्यात आज 6,258 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 645 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 58 हजार 751 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.54 टक्के आहे.
राज्यात आज 254 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 26 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 82 हजार 082 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (43), हिंगोली (53), यवतमाळ (9), गोंदिया (53), गडचिरोली (57), चंद्रपूर (69) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आज एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 771 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 71,76,715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,76, 057 (13.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,98,933 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत आज 343 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या 24 तासात 343 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 11 हजार 315 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मुंबईत सघ्या 5267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा दर आता 1377 दिवसांवर पोहोचला आहे.
Corona Vaccination : देशभरात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होण्याची शक्यता
देशात गेल्या 24 तासात 29689 नव्या रुग्णांची नोंद
आरोग्य मंत्रालयाने सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 689 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची एकूण संख्या कमी होऊन 3 लाख 98 हजार 100 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 14 लाख 40 हजार 951 वर पोहोचली आहे. तर महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 लाख 21 हजार 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 42 हजार 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा 3 कोटी 6 लाख 21 हजार 469 वर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
