(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE : राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरील एटीएमच चोरट्यांनी पळवले, 40 लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास
Breaking News LIVE Updates, 7 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवामुळं खळबळ
मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. दोन तास हे सर्च ऑपरेशन सुरु होतं, सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. या निनावी फोननंतर भायखळा, दादर रेल्वे स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. या स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. शुक्रवारी रात्री 9 : 45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून हॉक्स कॉल करणाऱ्या इसमाचा शोध सुरु आहे.
शुक्रवारी रात्री 9 : 45 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा रेल्वे स्थानकं आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे विभागाकडून ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक चारही ठिकाणी दाखल झालं. बराच वेळ शोधाशोध करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटकं किंवा संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळून आली नाही. पोलिसांनी ज्या नंबरवरुन फोन आला त्या नंबरवर फोन केला. त्यावेळी, समोरच्या व्यक्तीनं माझ्याकडे जी माहिती होती, ती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करुन नका, असं सांगितलं आणि फोन स्विच ऑफ केला. त्याचा फोन बंद असल्यामुळं पोलिसांना त्याचा शोध घेणं काहीसं कठिण होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर वर्धा रोडवरील "ट्रॅव्होटेल" या हॉटेलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या मालिकेत आज नागपूर वर्धा रोडवरील "ट्रॅव्होटेल" या हॉटेलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती आहे.
राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरील एटीएमच चोरट्यांनी पळवले, 40 लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दोऱ्यावर आहेत. त्यामुळे सर्वत्र कडक बंदोबस्त असताना हिंगोलीच्या शिरड शहापूर येथील एटीएमच चोरट्यांनी पळविले . त्यात तब्बल 40 लाखांपेक्षा जास्त रक्कम होती. महत्त्वाचे म्हणजे याच रस्त्यावरून सकाळी राज्यपाल नांदेडहून हिंगोलीला आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचा सत्कार
पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचा सत्कार समारंभ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडण्यात आला. पद्मश्री सय्यदभाई, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, पोपटराव पवार तसेच सरस्वती सन्मान विजेते साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा : हसन मुश्रीफ यांची माहिती
दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झालीय,
याबाबत एक app च्या माध्यमातून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत,
आता याबाबत निर्णय होणार आहे, त्याच श्रेय घेण्यासाठी यांची धडपड सुरू आहे,
हसन मुश्रीफ यांचा विरोधकांना टोला,
महाड येथे आढळले एकूण सुमारे 40 लेप्टोस्पायरसिसचे रुग्ण
महाड येथे आढळले एकूण 40 लेप्टोस्पायरसिसचे रुग्ण...
महाड पोलादपूर परिसरात आढळले 9 कोरोनाबाधित रुग्ण...
महाड पोलादपूर परिसरातील दोन हजारपेक्षा अधिक रहिवाशांची अँटीजन चाचणी करण्यात आली..