Breaking News LIVE : मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल
Breaking News LIVE Updates, 5 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
Mumbai Local : परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकल प्रवाशांवर का?
सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र दुसरीकडे अनेक राज्यातून हजारो प्रवासी रोज मुंबईत दाखल होत आहेत. या प्रवाशांची चाचणी होणं अपेक्षित असले तरी, रेल्वे स्थानकांवर ही चाचणी होत नाही. मग मुंबई आणि आसपासच्या शहरात लाखो लोकांचं लसीकरण झालं असूनही त्यांना प्रवासाची मुभा का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.
मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत. पण दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.
Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या असल्या तरी, आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज पहिलवान रवि दाहिया सुवर्णपदक, तर भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
यासोबतच आज दीपक पुनिया, विनेश फोगाट यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच आज ज्या सामन्यावर साऱ्या भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत, तो म्हणजे, पुरुषांची फ्री स्टाईन कुस्तीचा 57 किलोग्राम वर्ग. रवि दाहिया अंतिम सामन्यात रशियाच्या ऑलिम्पिक कमिटीच्या वतीनं यंदा टोकियोत खेळणाऱ्या पहिलवान जावूर उगुएवच्या विरोधात मैदानावर उतरणार आहे.
रवि दाहियाकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा
या सामन्यात भारताकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. रवि दाहिया सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाला सोनीपतच्या नाहरी गावात राहणाऱ्या या पहिलवानाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. हा सामना दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास सुरु होईल.
मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल
मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल. उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे सीईओ विभु अग्रवाल आणि कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्यावर गुन्हा दाखल. कंपनीच्या अंधेरी कार्यालयच्या स्टोअर रूममध्ये 28 वर्षीय लिगल अॅवायझर मुलीला स्टोर रूममध्ये घरच्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन कपडे काढून आरोपींनी समोरच अंतवस्र घालण्यास भाग पाडल्याचा तरूणीचा आरोप. 18 जूनची घटना असून अंबोली पोलिसांनी बुधवारी नोंदवला गुन्हा.
मुंबईच्या एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगचा गुन्हा दाखल
भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी 11.30 वाजता भेट घेणार
भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सकाळी 11.30 वाजता भेट घेणार. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परीषदेत राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याच स्पष्ट केल होतं. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
नाशिक : वेळ वाढवून द्या या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई
नाशिक : वेळ वाढवून द्या या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या नाशिकमधील रेस्टॉरंट चालकांवर पोलिसांची कारवाई, 13 व्यावसायिकांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल, मनाई आदेश असतांना कोरोना काळात आंदोलन केले, महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी कारवाई, रेस्टॉरंट चालक संतप्त
पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली
पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. राज्य सरकारने पुणे शहराचे निर्बंध शिथिल न केल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज 4 वाजल्यानंतर पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरती व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली आहेत. काल महापालिका आणि पोलिसांनी दुकानावर दंडात्मक कारवाई केली होती.