एक्स्प्लोर

धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मोबाईलमध्ये चित्रीकरण का करत आहेत, म्हणत पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांचा मोबाईल हस्तगत करून त्यांना बेदम मारहाण केली.

Parbhani: परभणीत 10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर, 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला. बंद दरम्यान, दुपारी 12 नंतर शहरातील बाजारपेठेमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धरपकड आणि लाठीचार्ज केला. या कारवाई दरम्यान, बऱ्याच महिलांना पोलिसांनी धरपकड करत मारहाण केल्याचे आता सीसीटीव्हीतील व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.

परभणी शहरातील वत्सला मानवते या 50 वर्षीय महिला प्रियदर्शनी नगर भागात राहत आहेत. 11 डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान, वसमत रोडवरील सावली विश्रामगृहासमोर असलेल्या ग्राउंडमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना धरपकड करण्यात येत होती. पोलिसांकडून धरपकड आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ वत्सला मानवते या आपल्या मोबाईलमध्ये बनवत होत्या. मोबाईलमध्ये चित्रीकरण का करत आहेत, म्हणत पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांचा मोबाईल हस्तगत करून त्यांना बेदम मारहाण केली. पोलीस एवढ्यावर थांबले नाहीत तर वत्सला मानवते यांना थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर, सायंकाळी सहा ते रात्री अडीच वाजेपर्यंत त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रात्री अडीच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पाच दिवस झाले, त्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या सर्वच शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

पोलिसांनी काहीच ऐकले नाही..

"आंदोलनामध्ये मी सहभागी झाले नव्हते. मी मोर्चामध्ये देखील नव्हते. फक्त माझा गुन्हा एवढाच होता की माझ्यासमोर मारहाण होत होती आणि मी त्याचे माझ्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. मी एका दवाखान्यामध्ये सिस्टर म्हणून काम करत आहे. माझा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. मी पोलिसांना ही सर्व गोष्ट सांगत होते, पण पोलिसांनी काहीच ऐकले नाही व मला जबर मारहाण केली. त्यामुळे मला न्याय मिळावा यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. मानवाधिकार आयोगाकडे माझ्या नातेवाईकांनी तक्रार केली असून, मला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही," असे वत्सला मानवते म्हणाल्या.

दोषी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

हा संपूर्ण प्रकार आम्ही प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे व नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांच्या समोर मांडला, पण या दोघांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मात्र संबंधित प्रकाराची दखल घेतली असून, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितले आहे. या प्रकरणी सुजात आंबेडकर यांनी या महिलेची भेट घेऊन पाहणी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह परभणी आणि राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Embed widget