एक्स्प्लोर

Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. डिसेंबरचा तिसरा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच 2024 वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

या आठवड्यात तुमच्यात एक नवी ऊर्जा दिसून येईल. कामात नवीन सुरुवात होण्याची चिन्हं आहेत, तुम्हाला वरिष्ठांकडून एखादी वेगळी जबाबदारी दिली जाऊ शकते. वैयक्तिक जीवनातही आनंदाचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा असेल. जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते. नवीन आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

डिसेंबरचा तिसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी सावधानतेचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नातेसंबंध नीट हाताळण्याची गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने संबंध दृढ होतील. आर्थिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. करिअरमध्ये सावध राहा, कारण सहकारी तुमच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण करू शकतात.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन आठवड्यात प्रवासाचे योग आहेत, जे फायदेशीर ठरतील. तुमच्या कामाच्या संदर्भात वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता ठेवा.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने आणि समजून घेऊन काम करा. नोकरदारांसाठी वेळ सकारात्मक राहील. कौटुंबिक वाद टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन योजना राबवण्यासाठी आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हं आहेत. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगले क्षण घालवाल. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असेल. कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा यश आणि समाधान देईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासासाठी अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

तूळ रास (Libra Weekly Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या राशीचे लोक नवीन आठवड्यात सामाजिक कार्यात व्यस्त असतील. तसेच, तुमच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. आर्थिक बाबतीत पैसे खर्च करताना सावधानता बाळगा. तसेच, पैशांचा अतिवापर देखील करु नका. नवीन आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहावं लागेल. तसेच, या काळात तुम्ही योग, ध्यान, व्यायामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. बॉसकडून तुमच्यावर नवीन जबाबादाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या काळात तुमच्यासमोर प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग आहे. मात्र, आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी तुमचे खर्च जपून करा. कुटुंबियांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामातून चांगला लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुर्लक्ष केल्यास साथीचे आजार उद्भवू शकतात. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सर्वसामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. तसेच, तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, सकस आहार घ्या. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास अधिक पटीने वाढेल. कामात तुमचं मन रमेल. अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करा. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. या काळात अनावश्यक खर्च करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Gochar 2025 : अवघ्या 3 महिन्यांत शनीचं राशी परिवर्तन; 2025 मध्ये 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावलेTeam Fadanvis Oath Ceremony : फडणवीसांच्या शिलेदारांची शपथ; 19 आमदार प्रथमच मंत्री !TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 डिसेंबर 2024 : ABP MajhaUstad Zakir Husaain passed Away : वयाच्या 73व्या वर्षी झाकीर हुसैन यांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीची ठिणगी, तानाजी सावंतानंतर भाजपचा कट्टर समर्थक आमदार अधिवेशन सोडून घरी परतला
Parbhani Band: सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू; आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकरी समाज एकटवणार
Mumbai Crime News: फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
फरसाण विकणाऱ्या आरोपीने महिलेला पाहून केले अश्लील कृत्य; दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार, मागे आला अन्
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
माझे बाबा एसटी ड्रायव्हर, आईनं शपथविधी टीव्हीवर पाहिला असेल, संजय शिरसाट भावूक, म्हणाले..
Maharashtra Cabinet Expansion: परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
परफॉर्म ऑर पेरिश! भाजपही एकनाथ शिंदेंचा पॅटर्न वापरणार? अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या फॉर्म्युलाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Devendra Fadnavis: परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई किंवा कोम्बिंग ऑपरेशन नको, पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना आदेश
परभणी हिंसाचारप्रकरणात आकसबुद्धीने कारवाई नको पण दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी: फडणवीस
Cold Wave Mahararashtra: राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे  किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता, मध्य महाराष्ट्रासह इथे किमान तापमान हाडं गोठवणार! वाचा IMDचा सविस्तर अंदाज
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
Embed widget