एक्स्प्लोर
पिंपरीत चिमुरड्याने सेल गिळला, दहा दिवसातली दुसरी घटना
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका चिमुरड्याने बटण सेल गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या चिमुरड्यावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण बचावले आहेत. शहरात गेल्या दहा दिवसातील बटन सेल गिळल्यानं चिमुरड्यांचा जीव धोक्यात आल्याची ही दुसरी घटना आहे.
मागच्या आठवड्यात दीड वर्षीय प्रांजलने गिळलेल्या बटण सेलचा पोटात स्फोट झाल्याच्या धक्कादायक घटनेतून, इतर पालकांनी काहीच धडा घेतला नसल्याचं आता समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात सहा वर्षीय घनश्यामने सेल गिळल्याची घटना समोर आली आहे.
प्रांजलने 8 नोव्हेंबरला रिमोट मधील बटन सेल गिळले होते, घनश्यामने देखील 16 नोव्हेंबरला तशाच एका रिमोटमधले सेल गिळले आणि ते जठारात अडकले. घनश्यामने दोन दिवस हा प्रकार घरात सांगितलाच नाही. मात्र त्रास असह्य होऊ लागल्यानं त्याने अखेर हे वडिलांना सांगितलं.
घनश्यामच्या पालकांनी तातडीनं चिंचवड मधील नित्यानंद डायग्नेस्टिव्ह डायजेस्ट सेंटर हे रुग्णालय गाठलं. डॉक्टरांनी तातडीनं दुर्बिणीने शस्त्रक्रिया करत घनश्यामला जीवदान दिले. नित्यानंद रुग्णालयात बटन सेल, कॉईन, खिळे, सेफ्टी पिन असे एकनानेक धोकादायक वस्तू गिळणारे रुग्ण आठवड्यातून एखादा उपचारासाठी दाखल होतात. अशा व्यक्तींवर यशस्वी शस्त्रक्रिया होतात खऱ्या, मात्र भविष्यात त्यांच्या जीवाला धोका हा कायम असतो.
प्रांजल आणि घनश्यामने ज्या रिमोटमधील चपटे सेल गिळले, ते रिमोट या तंत्रज्ञानाच्या नव्या बदलातील आहे. हा नवा बदल जितका तुम्हा-आम्हाला आकर्षक वाटतो, तितकाच तो चिमुरड्यांसाठी घातक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement