Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरीकडे अजितदादांच्या अपघातावर घातपाताचा संशय; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: महाराष्ट्राचे 2026 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू झाले असून 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनात 18000 कोटींहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या असून, महायुती सरकारवर विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
बारामती पोलीस स्टेशनमधील ब्लॅक बॉक्सचा फोटो व्हायरल, अजितदादांच्या अपघातावरून पुन्हा चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AAIB चे अधिकारी के. रामचंद्रन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा ब्लॅक बॉक्स पोलीस ठाण्यात ठेवला होता. फक्त ब्लॅक बॉक्सच नाहीतर विमानाचे इतरही पार्ट पोलीस ठाण्यात ठेवले होते. आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का हे मात्र समजू शकले नसले तरी यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
Mumbai News: ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण
Mumbai News: ताडदेव, नागपाडा आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होणार असून दक्षिण मुंबईतील पूर्व–पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार आहे.मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हा 333 मीटर लांबीचा पूल ताडदेव आणि नागपाडा परिसराला थेट जोडतो. पुलामुळे बेलासिस रोड, ग्रँट रोड, पठ्ठे बापूराव मार्ग आणि महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.मुंबई सेंट्रलजवळील 130 वर्ष जुना पूल पाडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून हा मार्ग बंद होता. नव्या उड्डाणपुलामुळे पूर्व–पश्चिम वाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग पुन्हा उपलब्ध होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
Nanded News: मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी, दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने घेतला गळफास; नांदेडमधील धक्कादायक घटना
Nanded News: दहावी वर्गात शिकत असलेल्या एका 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक नांदेड शहरात घडली. तिच्या या आत्महत्येचं कारण देखील तितकचं धक्कादायक असल्याचे समोर आलं आहे. बोलण्यासाठी आणि लग्नास भाग पाडण्यासाठी तरुणांनी तगादा लावला आणि मोबाईलमधील जोडीने काढलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जातं असल्याने, बदनामीच्या भीतीपोटी मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तरुणासह पाच जणा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
























