सोलापुरात बनावट नोटा तयार करणारा अड्डा उध्वस्त; दोघेजण ताब्यात
सोलापुरात बनावट नोटा तयार करणारा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोघेजणांना ताब्यात घेतलं असून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
सोलापूर : सोलापुरात बनावट नोटा तयार करणारा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. विष्णू सिद्राम गायधनकर आणि संजय धनु पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी शंभर रुपयांच्या 610 आणि पाचशे रुपयाच्या 100 नोटा अशा एकूण 1 हजार 110 बनावट नोटा कारवाई दरम्यान जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य देखील पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केलं आहे.
सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांना या बाबात माहिती मिळाली होती. एक व्यक्ती बनावट नोटा खऱ्या भासवून वितरीत करीत आहे. विजापूर नाका पोलीस स्थानकाचे पोलीस आसरा चौक या ठिकाणी पोहोचले असता एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचं निदर्शनास आलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव संजय पवार असल्याचे सांगितले. तर सदरच्या बनावट नोटा ह्या विष्णु सिद्राम गायधनकर यानी कमशिनवर वितरीत करत असल्याचे कबूल केले. त्याच्या माहितीच्या आधारवर पोलिसांनी सोलापुरातील भारत हौसिंग सोसायटी धाड घातली.
पुण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून; पाच-सहा जणांचा धारदार शस्त्रांनी हल्ला
सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
या ठिकाणी पोलिसांना शंभर रुपये दराच्या 610 नोटा, पाचशे रुपयाच्या 100 नोटा, बनावट नोटा छापण्याकरीता लागणारे कलर प्रिंटर, शाईच्या बाटल्या, पेपर कटर वगैरे असे एकून 1 लाख 21 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात भांदवि 489, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ST Workers Protest | मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एसटी कर्मचारी नाराज; आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम