एक्स्प्लोर
Booster Dose Live Updates : आजपासून 'बूस्टर', वाचा यासंबंधीचे प्रत्येक अपडेट्स
Booster Dose : देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात झालीय.
Key Events

Booster Dose Live Updates
Background
13:06 PM (IST) • 10 Jan 2022
पुण्यात आजपासून 179 केंद्रांवर बूस्टर रोज द्यायची सुरूवात
पुण्यात आजपासून 179 केंद्रांवर बूस्टर रोज द्यायची सुरूवात महापालिकेने केली आहे ..आज सकाळपासूनच बूस्टर डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केलेली पाहायला मिळाली... गेले दोन दिवस कोविन ॲप वरून दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस संदर्भातली माहिती देणारे मेसेजेस सातत्याने येत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली आहे... 25 टक्के ऑनलाईन आणि 25 टक्के ऑफलाइन अशा पद्धतीने बूस्टर डोस देण्यात येणार असून 179 केंद्रांवर कोविशील्ड तर दहा केंद्रांवर covaxin देण्यात येणार आहे
11:04 AM (IST) • 10 Jan 2022
बूस्टर डोसला नाशिकमध्ये सुरुवात
केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार आजपासून बूस्टर डोसला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. वरीष्ठ अधिकारी, फ्रंटलाईन वर्कर ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जाणार आहे.सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोहिमेचा शुभारंभ झाला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, यांच्यांसह जिल्हापरिषद CEO आणि पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतला.
Load More
Tags :
Health Workers Frontline Workers Booster Dose Comorbid Senior Citizen Booster Dose Guideline Booster Dose Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























