एक्स्प्लोर

जांभूळखेडा बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड नक्षली दिनकर गोटा जेरबंद, गडचिरोली पोलिसांची कारवाई

कुरखेडा तालुक्यातील मौजा दादापूर येथे नक्षलीनी 36 वाहने जाळली होती. लगेच दुसऱ्या दिवशी 1 मे 2019 रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे 15 जवान आणि 1 खाजगी वाहन चालक शहीद झाले होते.

गडचिरोली : पंधरा जवान आणि एका खाजगी वाहनचालकाचा मृत्यू झालेल्या 1 मे 2019 च्या गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा घटनेचा सुत्रधार कुख्यात नक्षल नेता दिनकर गोटा याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. 18 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलींना बुधवारी (4 मार्च) अटक करण्यात आली. कुरखेडा तालुक्यातील मौजा दादापूर येथे नक्षलीनी 36 वाहने जाळली होती. लगेच दुसऱ्या दिवशी 1 मे 2019 रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे 15 जवान आणि 1 खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारांपैकी दिनकर गोटा एक होता. नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीचा तसेच कोरची दलमच्या उपकमांडर पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा आणि कोरची दलमच्या सदस्य पदावर कार्यरत असलेली महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिच्यासह गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने पहाटे गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. नक्षली दिनकर गोटाची गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात पकड होती. दिनकर गोटा याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 108 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 33 खूनांचा समावेश आहे. त्याच्यावर एकूण 16 लाखांचे बक्षीस होते. सुनंदा कोरेटी त्याची पत्नी असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. ती 2009 साली नक्षल दलममध्ये भरती झाली. सध्या ती नक्षल्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकुण 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 28 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत असलेला विलास कोल्हा याने एके-47 शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते. तर नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपुर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले होते. जांभुळखेडा घटनेचा संपूर्ण तपास करुन तपास एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आला होता. आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने यापुर्वीच अटक केली. यानंतर गडचिरोली पोलीस दलाने कुख्यात नक्षली दिनकर गोटा याला अटक केल्याने उत्तर गडचिरोली भागात नक्षलवाद्यांना जबर धक्का देण्यात गडचिरोली पोलीस दलाने यश मिळविले आहे. नक्षली दिनकर गोटा व सुनंदा कोरेटी यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनकर गोटा हा सप्टेंबर 2019 मध्ये एका नक्षल महिलेसह दलम मधुन बाहेर गेल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. यानंतर सातत्याने गाडचिरोली पोलीस दल नक्षली दिनकर गोटा याच्या मागावर होते. अखेर आज गडचिरोली पोलीस दलाच्या अखंड प्रयत्नांना यश आले. त्यानंतर जहाल नक्षली दिनकर गोटा आणि सुनंदा कोरेटी यांना जेरबंद करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. दिनकर गोटाच्या अटकेमुळे 1 मे 2019 रोजी जांभूळखेडा घटनेतील शहीद जवानांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Naxal Leader Surrender | नक्षली कमांडर विलास कोल्हाचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण | ABP Majha संबंधित बातम्या :  गडचिरोली जिल्ह्यासाठी 231 कोटींचा निधी मंजूर, मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्याचे अजित पवारांचे आदेश नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलास अभूतपूर्व यश, पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadguru Feet Pic Controvercy:सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!
मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : ऑक्टबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यताTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange PC Sambhajinagar : Devendra Fadnavis मराठ्याच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा : जरांगेABP Majha Headlines : 12 PM  : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadguru Feet Pic Controvercy:सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
सदगुरु जग्गी वासुदेव त्यांच्या पायांचा फोटो किती रुपयाला विकतात माहितीये? सोशल मीडियावर गदारोळ
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
100 रुपयांचा स्टँप बंद, सर्वसामान्यांना भुर्दंड; सरकारने निर्णय, आता कमीत कमी पाचशे
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
उद्योगमंत्र्यांचं नाशिककरांना मोठं गिफ्ट? उदय सामंत म्हणाले, डिसेंबरच्या आधीच मोठा प्रकल्प येणार...
मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!
मोठी बातमी : चैतन्य महाराजांना बेड्या, सोशल मीडियावर उपदेशाचे डोस देणारे महाराज पिंपरी पोलिसांच्या कचाट्यात!
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
PM Kisan: 5 ऑक्टोबरला मिळणार 2000 रुपये, देशातील 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा   
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
दोन प्रदेशाध्यक्ष एकाचवेळी कोराडी देवीच्या दर्शनाला; नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Pune Crime: बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
बाप की सैतान! पोटच्या मुलीवर वर्षभरापासून अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार अन्..., असे झाले काळे कारनामे उघड
Sangli News : सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
सांगली शहरातील मोकाट कुत्र्यांचा थेट मनपा आयुक्तांनाच फटका; कार अपघातात डोक्याला दुखापत
Embed widget