एक्स्प्लोर

गडचिरोली जिल्ह्यासाठी 231 कोटींचा निधी मंजूर, मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्याचे अजित पवारांचे आदेश

नक्षलप्रभावित जिल्ह्यातील नक्षल समर्पित व्यक्ती व नक्षल पीडित व्यक्ती यांच्यासाठी 10 कोटी जास्तीचा निधी मंजूर करण्यात आला. अजित पवार यांनी गडचिरोली मधील नक्षल प्रभाव कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार विविध निधींची वाढीव मागणी या वेळी मंजूर केली.

गडचिरोली : वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत गडचिरोली जिल्ह्यासाठी 231.40 कोटी रुपयांच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. यामध्ये नियतव्यय मर्यादा ही 149.64 कोटींची आहे. या व्यतिरिक्त वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार वाढीव 50 कोटी आरोग्य, शिक्षणासह इतर विषयांसाठी मंजूर केले. आरोग्य सुविधांसाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नक्षलप्रभावित जिल्ह्यातील नक्षल समर्पित व्यक्ती व नक्षल पीडित व्यक्ती यांच्यासाठी 10 कोटी जास्तीचा निधी मंजूर करण्यात आला. अजित पवार यांनी गडचिरोली मधील नक्षल प्रभाव कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार विविध निधींची वाढीव मागणी या वेळी मंजूर केली. नक्षल समर्पित व पीडितांना बरोबरच पोलिसांच्या राहण्याची उत्तम सोय होण्याकरिता पोलीस निवास्थान या कारणासाठी जास्तीचे 15 कोटी मंजूर करण्यात आले. तसेच पोलिस विभागासाठी असणाऱ्या वाहनांकरिता 1 कोटी वेगळा निधी देण्यात आला. या प्रकारे जिल्ह्यासाठी सन 2020-21 साठी वाढीव निधी सह 231.40 कोटींना आज झालेल्या बैठकीत वित्त मंत्री महोदयांनी मंजुरी दिली. या बैठकीसाठी वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याबरोबर गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार देवराव होळी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक कमी आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना दिला. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण विषयक बाबींसाठी अतिरिक्त वाढीव निधी खर्च करणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी वाढीव निधी बाबत कारणे व योजनांबाबत माहिती सादर केली. जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी शिक्षण व आरोग्य योजनावर यामध्ये प्राधान्याने तरतूद केलेली आहे. ग्राम विकासाकरिता प्राथमिकता देऊन तसेच वन आधारित विकासाला चालना देण्यासाठी या वाढीव निधीचा उपयोग केला जाणार आहे. याच बरोबर रस्ते विकास व विद्युत जोडणीकरिता कामे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जातायेत का? एकनाथ शिंदे म्हणाले मला काय फरक पडतो? त्यांना जवळ तर घ्यायाला पाहिजे
उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जातायेत का? एकनाथ शिंदे म्हणाले मला काय फरक पडतो? त्यांना जवळ तर घ्यायाला पाहिजे
धक्कादायक! पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पाण्याचा अंदाज न आल्यानं लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तरुणाचा मृत्यू 
धक्कादायक! पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पाण्याचा अंदाज न आल्यानं लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तरुणाचा मृत्यू 
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
Video: भविष्यात पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवार म्हणतात, ताईंचं वक्तव्य अतिशय चांगलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2026 | गुरुवार 
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
... तेव्हाच,पवार विरुद्ध पवार होणार नाही; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचे परखड भाष्य, नेमकं काय म्हणाले?
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
दिवंगत संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून दोन पत्नीमध्ये कायदेशीर लढाई; प्रियाला झटका अन् करिश्माच्या दोन्ही मुलांना न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
मलासुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, पण...; बच्चू कडूंना शुभेच्छा देत रवि राणांनी सांगितलं पुढचं राज'कारण'
Supriya Sule : पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा
पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन, मला देशाची सेवा करायचीय : सुप्रिया सुळे
Embed widget