एक्स्प्लोर
अकोल्याच्या महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल
अकोला : अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे. काँग्रेस उमेदवारावर मात करुन भाजपचा महापौर विराजमान झाला. उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके विराजमान झाल्या आहेत.
भाजपच्या विजय अग्रवाल यांना 49, तर काँग्रेसच्या मोहम्मद नौशाद यांना 17 मतं मिळाली. अकोला महापालिकेत भाजपला 80 पैकी 48 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे 8, राष्ट्रवादीचे 5 आणि एमआयएमचा 1 आणि 1 अपक्ष तटस्थ राहिले आहेत.
अकोल्याच्या उपमहापौरपदी भाजपच्याच वैशाली शेळके विराजमान झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव यांचा पराभव केला. महापौरपदी विराजमान झालेले विजय अग्रवाल हे स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते महापालिकेत नगरसेवक आहेत.
उपमहापौर वैशाली शेळके
अकोला महापालिका
- भाजप - 48
- शिवसेना - 8
- काँग्रेस - 13
- राष्ट्रवादी - 5
- मनसे - 0
- इतर - 6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement