एक्स्प्लोर

भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू : मुख्यमंत्री

मुंबई: शिवसेना 147 आणि भाजप 127 जागा आणि 18 जागा मित्रपक्ष लढतील, असा निर्णय झाला होता. मात्र, 151 पेक्षा कमी जागा आम्ही लढणार नाही, असा हट्ट केला गेला. शिवसेना 151 जागांवर अडून बसली आणि शिवसेनेने युती तोडली. युतीत सडलो म्हणणारे 25 वर्ष आमच्या पाठिंब्याने महापौरपदी बसले. मात्र 25 वर्षात मुंबईला बकाल केलं, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका करत, चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने युती तोडल्यानंतर, तुम्ही काय उत्तर देणार असं मला लोक विचारत होते. मात्र आम्ही जुगलबंदी किंवा मनोरंजन करणारे लोकं नाही, आम्ही नोटाबंदी आणि भ्रष्टाचारबंदी करणारे लोक आहोत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. युती तुटली नसती तर मुख्यमंत्री झालो नसतो शिवसेने युती तोडली. मात्र यापूर्वी शिवसेनेने युती तोडली नसती तर मी कधीच मुख्यमंत्री झालो नसतो, युती तुटली म्हणूनच आमची ताकद समोर आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून भाजपची ताकद दिसली, पण तरीही मुंबई महापालिका युतीसाठी माघार घेतली. युतीसाठी पारदर्शीपणा ही एकच अट ठेवली, पारदर्शीपणा ही माझी चूक आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. भगवा हाती घेऊन खंडणी सत्तेत येऊन हाती भगवा घेऊन खंडणी वसुली करणं हे कदापी खपवून घेणार नाही, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तुम्ही सांगा, पारदर्शी कारभार करु शिवसेना नेते म्हणाले, मुंबई पालिकेत पारदर्शीपणा हवा असेल, तर राज्य आणि केंद्र सरकारमध्येही हवा. मी सांगेन की तुम्ही सांगाल तेवढा पारदर्शीपणा राज्य सरकारमध्ये आणायची माझी तयारी आहे, तुम्ही सांगा आपण आणखी पारदर्शी कारभार करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही नव्हे, जनतेने म्हणायला हवं करुन दाखवलं तुम्ही म्हणता करुन दाखवलं, पण ते तुम्ही स्वत: म्हणून नका. एखादं काम केलात तर जनता स्वत:च म्हणेल, होय तुम्ही करुन दाखवलं, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आम्हाला मराठी-अमराठी भेद करायचा नाही : मुख्यमंत्री “आम्हाला मराठी-अमराठी भेद करायचा नाही. मुंबईत मराठी आणि जे बाहेरून आले त्यांनी पण विकासात भूमिका निभावली. निवडणुका आल्या की भाषावाद, प्रांतवाद सुरु करायचा. मोदीजींनी सांगितलं, सबका साथ सबका विकास.”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईचा विकासाची निवडणूक : मुख्यमंत्री “कोस्टल रोडसाठी आम्ही परवानगी आणतो. ते म्हणतात महापालिका कोस्टल रोड बांधेल आणि कोळी समाजाला जाऊन सांगायचे रोड आला तर तुमचं नुकसान होईल. कोस्टल रोडच्या टेंडरमध्ये आम्हाला रस नाही, आम्हाला कामात रस आहे.”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कोस्टल रोडच्या मुद्द्यावरुन घणाघात केला. मुंबईच्या विकासाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? महापालिकेत सत्ता आल्यावर गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी काम करणार. झोपडपट्टीतील 60 टक्के गरिबांसाठी योजना आणणार, असे मुख्यमंत्री म्हणाले, त्याचसोबत, “आम्ही करुन दाखवले बोलणारे नाही. आम्ही काम करतो, तेव्हा जनता म्हणते तुम्ही काम केलं. एलिव्हेटेड रेल्वे योजना नीती आयोगातून आम्ही मंजूर केली. मुंबईत सीसीटीव्ही आणले, मेट्रो जाळं तयार करत आहोत.”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अपडेट : Live Update : आज पाणी पितो आहे, 21 तारखेला पाणी पाजणार आहे - मुख्यमंत्री Live Update : कोळी बांधवांच्या कोणत्याही गोष्टीला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री Live Update : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू आपण बांधतोय - मुख्यमंत्री Live Update : मुंबईतील झोपडपट्टीतल्या 60 टक्के जनतेसाठी काम करायचंय - मुख्यमंत्री Live Update : आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे - मुख्यमंत्री Live Update : जनतेने म्हटलं पाहिजे, ‘करुन दाखवलं’ - मुख्यमंत्री Live Update : भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही नेटवर्क उभं केलं - मुख्यमंत्री Live Update : भाजपची औकात काय ते 21 तारखेला दाखवू - मुख्यमंत्री Live Update : शिवसेनेचा आचार आणि भ्रष्टाचारी कारभार आम्हाला मान्य नाही - मुख्यमंत्री 14 Live Update : पारदर्शीच्या अजेंड्यावर तडजोड करायचं नाही, हे आमच्या नेत्यांना सांगितलं - मुख्यमंत्री Live Update : चुका कबूल करुन पुढे जातो, तो प्रामाणिक असतो - मुख्यमंत्री Live Update : पारदर्शीपणेच राज्याचा कारभार चालवतो आहे - मुख्यमंत्री Live Update : भगवा झेंडा घेऊन हफ्ता वसुली करण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही - मुख्यमंत्री Live Update : विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो - मुख्यमंत्री Live Update : आम्ही जुगलबंदी करणारे नेते नाही, आम्ही मनोरंजन करणारे नेते नाही - मुख्यमंत्री Live Update : आम्ही जुगलबंदी करणारे नेते नाही, आम्ही मनोरंजन करणारे नेते नाही - मुख्यमंत्री 10 Live Update : जो मैं बोलता हूँ, वह मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता, वह डेफिनेटली करता हूँ – आशिष शेलार Live Update : शिवसेनेच्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा उल्लेखही नाही – आशिष शेलार Live Update : मुंबईशी आमचं नातं विकासाचंच आहे – आशिष शेलार Live Update : मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी केला – आशिष शेलार Live Update : मुख्यमंत्री दिवसातील 20 तास काम करतात – आशिष शेलार Live Update : मुख्यमंत्री म्हणतात सत्ता हे साध्य नाही, साधन आहे – आशिष शेलार Live Update : भाजपसोबत पांडवसेना आहे, त्यामुळे कौरवांचा पराभव होणार – आशिष शेलार Live Update : आशिष शेलारांकडून स्वत:ची महाभारतातील पांडवांशी तुलना Live Update : जो अहंकाराची भाषा वापरेल, त्यांचा पराभव अटळ - आशिष शेलार 6 Live Update : हम किसी को छेडेंगे नहीं, मगर हमें किसी ने छेडा, तो छोडेंगे नहीं – आशिष शेलार Live Update : मीच शिवभक्त, असं म्हणणारा रावण अहंकाराने माजला, म्हणून त्याचा पराभव झाला - आशिष शेलार Live Update : उद्धव ठाकरेंना महाभारतातील दुर्योधनाची उपमा देत आशिष शेलार यांचा घणाघात Live Update : महाभारतातील युद्धही अहंकारामुळे घडलं, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला Live Upadate : काही लोकांना राज्यस्तरीय मेळावे बंद हॉलमध्ये करावे लागतात - आशिष शेलार Live Upadate : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भाषणाला सुरुवात 7 Live Update : ‘मुंबईचा विकास करणार कोण, भाजपशिवाय आहेच कोण’, संकल्प मेळाव्यात घोषणा Live Update : मुख्यमंत्र्यांसह भाजपचे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित Live Update : भाजपच्या संकल्प मेळाव्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचले Live Update : गायक नंदेश उमप यांच्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीताने भाजपच्या संकल्प मेळाव्याला सुरवात Live Update : भाजपच्या मुंबईतील संकल्प मेळाव्याला सुरुवात 3-compressed मुंबई : शिवसेनेने स्वबळाचे रणशिंग फुंकल्यानंतर आता भाजप पक्षही जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे. भाजपचा आज मुंबईतील गोरेगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विजय संकल्प मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यासह भाजप नेते काय प्रत्युत्तर देतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. ‘राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.’ अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर आता मुख्यमंत्री काय बोलणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संबंधित बातम्या :

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी

शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र

युती तुटताच भाजपची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी

निवडणुकांची रणधुमाळी आजपासून, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

युतीच्या काडीमोडनंतर उमेदवारीसाठी सर्वपक्षीय मातोश्रीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget