Keshav Upadhye : शरद पवार-ठाकरेंची जोडी महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा कट आखतेय, भाजप नेत्याचा जोरदार वार
Keshav Upadhye : केवळ सत्तेसाठी महाविकास आघाडीचा अनैतिक प्रयत्न फसल्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरेंची जोडी महाराष्ट्रात आराजत्ता माजवण्याचा कट करत असल्याची टीका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
Nashik Keshav Upadhye : केवळ सत्तेसाठी महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) अनैतिक प्रयत्न फसल्यानंतर शरद पवार(Sharad Pawar), उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जोडी महाराष्ट्रात आराजत्ता माजवण्याचा कट करत आहे. महाराजांच्या स्मारकावर जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्र सरकारने वेळीच दखल घेऊन त्याबाबत सर्व पावले उचलत आहे. असे असताना राज्यात घाणेरडे आणि नीच स्वरूपाचे राजकारण या जोडीने सुरू केले आहे.
त्यातून महाराष्ट्रात अशांतता निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची सुरू आहे. बदलापूरची घटनाही दुर्दैवीच होती. मात्र तिथे देखील राजकारण आणल्या गेलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणताही नवीन प्रकल्प राज्यात आला नाही. किंबहुना अनेक प्रकल्पांना त्यांनी स्थगिती दिल्याचा घणाघात भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे.
स्मारकाचा फोटो ट्विट करता, हे राजकारण नाही विकृती- केशव उपाध्ये
पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र दौरा होत आहे. पंतप्रधान हे देशाचे आहेत ते कुठल्या पक्षाचे नाही, दुर्दैवाने याचा भान काँग्रेसला राहिलेले नाही. पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचं काम काँग्रेस करत आहे. ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत, उद्धव ठाकरे करत आहे, यावरून हे दिसून येतं आहे की त्यांना नैरश्याने किती पछाडलं आहे. पंतप्रधान मोदींना माफी मागावी अशी मागणी हे लोक करत आहेत. मात्र खरच माफी मागायची असेल तर पंडित नेहरूंचं शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी अत्यंत वाईट उद्गार काढले त्याची आठवण काँग्रेसला करून द्यावी लागेल.
असे असताना या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी माफी मागितली आहे. त्या दृष्टीने तातडीने गोष्टी उचलणे महत्त्वाचे होते त्याही उचलल्या आहेत. या सगळ्या विषयात राजकारण न करता राजकीय टीका करा, तो अधिकार आहे. पण महाराजांच्या स्मारकाचा फोटो तुम्ही ट्विट करता हे राजकारण नाही विकृती असल्याची टीकाही केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे.
संजय राऊतांनी केलेलं सकारात्मक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा!
संजय राऊत यांना बडबड करण्याव्यतिरिक्त इतर केलेलं एक सकारात्मक काम दाखवा. रोज सकाळी उठून मोदीजी, देवेंद्रजी यांच्या बद्दल या सरकार बद्दल नकारात्मक, वाईट स्तरावरची भाषा करायची. संजय राऊत यांनी सकारात्मक केलेलं काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी महाराष्ट्रात जर योजना केली तर त्याचं बक्षीस घ्यायला महाराष्ट्रातील एकही माणूस पुढे येणार नाही. संजय राऊत यांना इतिहास माहित नाही ते कच्चे आहे किंवा ते खोटं बोलतात. याच महाराष्ट्रात 100 कोटीची खंडणी गोळा करणारा गृहमंत्री पाहिला आहे. समाज एकत्रित करणे प्रत्येकाचं काम असल्याचेही केशव उपाध्ये म्हणाले.
हे ही वाचा