एक्स्प्लोर

'व्हिडीओ क्लिप्स, फोटो समोर आल्यास अनेकांना हादरा बसेल', एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.भाजपच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लीप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत, अशी मागणी काँग्रेसने केलीय.

मुंबई :  एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र मी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारख्या चुका मी केल्या नाहीत, असं खडसे म्हणाले. या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर त्या बाबी मांडल्या आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन. यामुळं काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे होईल ते जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपाच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडिओ क्लीप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपाच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

'मी पुन्हा येणार' हा अहमपणा - खडसे

माझा कट्ट्यावर बोलताना खडसे यावेळी म्हणाले की, 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे 40 वर्षाच्या राजकीय जीवनात मी सांभाळलं. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. त्यांना राजीनामा द्या असं म्हटलं गेलं नाही. मात्र माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडं वळती करण्यात आली. पदाचा दुरुपयोग केला असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असं खडसे म्हणाले.

मी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोधात बोलतोय असं म्हणणं चुकीचं आहे. मी अन्याय झाला म्हणून बोलतो आहे. अनेकांवर अन्याय झाला. माझ्या मुलीनं तिकीट मागितलं नसताना तिकिट दिलं. आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणाऱ्या जागी तिकिटं दिली नाहीत, त्यामुळं जागा कमी आल्या असंही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा आहे, त्यामुळं लोकांनी नाकारलं असंही खडसे म्हणाले.

'नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान' पुस्तक कधी येणार?

एकनाथ खडसे यांचं 'नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान' हे पुस्तक कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, पेशवेकालिन इतिहासात नानासाहेब फडणवीसांच्या काळात बारभाई मंडळ होतं. त्यांची कारस्थानं होती. धरावेच्या ऐवजी मारावे असं केलं गेलं. तसंच नाथाभाऊंसोबत घडलंय, असं खडसे म्हणाले. नानासाहेब फडणवीसांचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहायला अजून सुरुवात केलेली नाही. यासाठी मी सगळी कागदपत्रं गोळा करत आहे. काही कागदपत्रं माहितीच्या अधिकारात मागवली आहेत. ती यायला दोन तीन महिन्यांचा कालावधी आहे. माझं पुस्तक हे वस्तुनिष्ठ असणार आहे, सत्य असणार आहे. उशीर लागला तरी चालेल पण त्यात सगळ्या गोष्टी येतील, या पुस्तकासाठी लेखकही भेटले आहेत. साधरणता पाच-सात महिने हे पुस्तक प्रकाशित व्हायला लागतील, असं खडसे यांनी सांगितलं.

कोणती यादी पाठवली जाते, कोणती डावलली जाते हे आम्हाला पक्क माहिती

1995 पासून आमच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता एकच निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कोणती यादी पाठवली जाते, कोणती डावलली जाते हे आम्हाला पक्क माहिती आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, राज्यसभेच्या वेळीही माझं नाव सुचवणार असं सांगितले पण त्यानंतरही नाव वरिष्ठांना नाकारलं असं सांगितले. विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं, जी नावे दिली ती वगळून दुसरी 4 नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका, देवेंद्र फडणवीस यांच्या यादीला संमती देत नाही म्हणजे कुठेतरी गडबड वाटते, कारण आमच्यावेळी वेगळं होतं, जी नावे आम्ही पाठवत होतो तीच नावं यायची असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस वरिष्ठांच्या जवळ आहे. महाराष्ट्रात सरकार आलं असतं पण मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे ही भूमिका घेतल्याने 105 जागा मिळूनही टाळ वाजवत बसावं लागलं नसतं. दोन्ही पक्ष मिळून संख्याबळ होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी काय बिघडलं असतं. युती म्हणून निवडणूक लढवली तडजोड थोडी केली असती तर ही वेळ आली नसती. मी पुन्हा येईन हे फक्त देवेंद्र फडणवीस म्हणत होते, बाकी कोण म्हणत नव्हते. भाजपाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, सभागृहात विरोधी पक्षनेते बोलतात पण बाहेर बोलणारे राहिले कुठे? सामुहिकपणे हल्लाबोल करुन राज्य सरकारला धारेवर धरता येते असंही खडसे म्हणाले.

'स्वत:हून राजीनामा दिला नाही, वरिष्ठांचं नाव सांगितल्यानं कोऱ्या कागदावर सही केली' : एकनाथ खडसे 

मी स्वत:हून राजीनामा दिला नव्हता - खडसे 

देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. स्वत:हून राजीनामा दिला नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे देशाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की राजीनामा द्या. वरिष्ठांकडून आदेश आहेत असं मला सांगितलं गेलं, त्यामुळं मी राजीनामा दिला, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

खडसे यावेळी म्हणाले की, वरिष्ठांचं नाव सांगितल्याबरोबर मी कोऱ्या कागदावर सही केली होती. मी स्वत:हून राजीनामा दिला नव्हता. मात्र पक्षानं मला असं सांगितलं होतं की, बाहेर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घ्याल त्यावेळी तुम्ही असं सांगा की तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. स्वत:हून चौकशीची मागणी केली असं सांगा, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. मी त्यावेळी विचारलं माझी काही चूक नाही. पण त्यांनी वरिष्ठांचं नाव सांगितल्यामुळं मी राजीनामा दिला, असं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला? खडसेंची खदखद आणि फडणवीसांचा निशाणा | स्पेशल रिपोर्ट

मी चांगला, तर मग मला तिकीट का दिलं नाही? भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचं म्हटलं. मग मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न मला आहे. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, असं खडसे म्हणाले होते. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ यांची भूमिका होती, असं ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणावर एकनाथ खडसे म्हणतात.. 

खडसेंवर गुन्हा माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, फडणवीसांचं उत्तर

'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता, मग माझ्यावर एवढा राग का?', खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

'10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायले' : एकनाथ खडसे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत मोठी घडामोड, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मंत्रिपद न मिळाल्यानं मोठा निर्णय
Devendra Fadnavis Cabinet Minister List : तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत मोठी घडामोड, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मंत्रिपद न मिळाल्यानं मोठा निर्णय
Devendra Fadnavis Cabinet Minister List : तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही, महायुतीत रामदास आठवले नाराज, आरपीआयला मंत्रीमंडळात संधी नाही
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
Embed widget