एक्स्प्लोर

'स्वत:हून राजीनामा दिला नाही, वरिष्ठांचं नाव सांगितल्यानं कोऱ्या कागदावर सही केली' : एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. स्वत:हून राजीनामा दिला नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे.

मुंबई :  देवेंद्र फडणवीसांवर नाव घेऊन आरोप केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता नवीन गौप्यस्फोट केला आहे. स्वत:हून राजीनामा दिला नाही, असं खडसे यांनी म्हटलं आहे. माझ्यावर आरोप झाल्यानंतर भाजपचे देशाचे सहसंघटनमंत्री व्ही. सतिश माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की राजीनामा द्या. वरिष्ठांकडून आदेश आहेत असं मला सांगितलं गेलं, त्यामुळं मी राजीनामा दिला, असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

खडसे यावेळी म्हणाले की, वरिष्ठांचं नाव सांगितल्याबरोबर मी कोऱ्या कागदावर सही केली होती. मी स्वत:हून राजीनामा दिला नव्हता. मात्र पक्षानं मला असं सांगितलं होतं की, बाहेर ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घ्याल त्यावेळी तुम्ही असं सांगा की तुम्ही स्वत:हून राजीनामा देत आहात. स्वत:हून चौकशीची मागणी केली असं सांगा, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. मी त्यावेळी विचारलं माझी काही चूक नाही. पण त्यांनी वरिष्ठांचं नाव सांगितल्यामुळं मी राजीनामा दिला, असं खडसे म्हणाले.

एकनाथ खडसेंना राजीनामा नेमका का द्यावा लागला? खडसेंची खदखद आणि फडणवीसांचा निशाणा | स्पेशल रिपोर्ट

खडसे यावेळी म्हणाले की, 40 वर्षांच्या राजकीय जीवनात एकाही विरोधकाने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. हे 40 वर्षाच्या राजकीय जीवनात मी सांभाळलं. आमच्या काळात अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. त्यांना राजीनामा द्या असं म्हटलं गेलं नाही. मात्र माझ्यावर आरोप झाले आणि मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. अगदी देवेंद्र फडणवीसांवर आरोप झाले. त्यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत काम करतात आणि गृहविभागाची सगळी खाती तिकडं वळती करण्यात आली. पदाचा दुरुपयोग केला असे आरोप विरोधकांकडून झाले. माझ्यावर विरोधकांनी कधीही आरोप केले नाहीत, असं खडसे म्हणाले.

मी मंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोधात बोलतोय असं म्हणणं चुकीचं आहे. मी अन्याय झाला म्हणून बोलतो आहे. अनेकांवर अन्याय झाला. माझ्या मुलीनं तिकीट मागितलं नसताना तिकिट दिलं. आणि तिला हरवण्याची व्यवस्था केली. विनोद तावडे, बावनकुळे आणि अशा अनेक निवडून येणाऱ्या जागी तिकिटं दिली नाहीत, त्यामुळं जागा कमी आल्या असंही खडसे म्हणाले. मी पुन्हा येणार हा अहमपणा आहे, त्यामुळं लोकांनी नाकारलं असंही खडसे म्हणाले.

लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार 

आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का? असं म्हणत एकनाथ खडसे यांनी नुकतंच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे, असं खडसे म्हणाले होते.  लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' हे पुस्तक लिहिणार असून त्यातून अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं खडसे म्हणाले होते. खडसे म्हणाले होते की, दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झाले होते. हा इतिहासाशी मिळता जुळता कार्यक्रम आहे. यावेळच्या वाढदिवस सुनील नेवे यांच्या पुस्तका मुळे लक्षात राहील, मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमाने लिहिलं आहे. तुमच्या मनात असलेले हे पुस्तक नाही ते अजून यायचं आहे. दाऊदच्या बायकोवरुन सोबत आरोप केले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली जाते. आता सगळे पुरावे मला मिळाले आहेत. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार आहे, असं खडसे म्हणाले होते.

मी चांगला, तर मग मला तिकीट का दिलं नाही? भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचं म्हटलं. मग मला तिकीट का दिलं नाही? हा प्रश्न मला आहे. माझा आवाज का बंद केला, ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे, असं खडसे म्हणाले होते. भाजपचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आमच्या काळातील नेत्यांनी केलं. आज मात्र चित्र वेगळं आहे. नाथाभाऊवर अन्याय का असा प्रश्न पडतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेना भाजपची युती नसताना यश मिळवून दिले. मुंडे हयात असते तर महाराष्ट्राच चित्र आज दिसत आहे ते दिसले नसते. गोपीनाथ आणि एकनाथ एक आहेत अशी गोपीनाथ यांची भूमिका होती, असं ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणावर एकनाथ खडसे म्हणतात.. 

खडसेंवर गुन्हा माझ्यामुळे नाही तर न्यायालयाच्या आदेशानं दाखल झाला, फडणवीसांचं उत्तर

'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता, मग माझ्यावर एवढा राग का?', खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल

'10-15 वर्षांपूर्वी पक्षात आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायले' : एकनाथ खडसे

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget