एक्स्प्लोर
Advertisement
लग्न, बर्थडे, पूजेसाठी पोलीस परवानगी अनिवार्य?
Hमुंबई: यापुढे लग्न, वाढदिवस, पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. कारण अशा समारंभासाठी राज्य सरकार नवी नियमावली आणण्याचा तयारीत आहे. अशा कार्यक्रमांना तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त पाहुण्यांना एकत्रित बोलवायचं असेल तर पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.
राज्य सरकारनं अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. विनापरवानगी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर 3 वर्ष तुरूंग आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीचं कारण देत सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सध्या सरकारनं याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. याबाबतचा मसुदा सरकारच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या गृहखात्यानं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्याला अद्यापही मान्यता मिळालेली नसली तरीही विरोधी पक्षांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे.
कायद्याचा मसुदा तयार:
* सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला असून त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.
* या कायद्याचा मसुदा 19 ऑगस्ट रोजी सरकारी वेबसाईटवर जारी करण्यात आला.
* अशाप्रकारचा कायदा सरकार तयार करणार असल्याची माहिती मिळताच विरोधी पक्षानं यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या मसुद्यावर आक्षेप घेतला आहे.
सुरक्षा समिती तयार करणार:
* या कायद्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत.
* या समितीत विरोधी पक्षाचा नेता किंवा इतर कुणीही प्रतिनिधी नसेल. ही समिती अंतर्गत सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे.
कायद्याला विरोधकांचा आक्षेप:
'अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅण्ड आणि जम्मू-काश्मीर यासारख्या अशांत राज्यात ज्याप्रमाणे सशस्त्र दल विशेष कायदा (आफ्सपा) लागू आहे त्याप्रमाणेच फडणवीस सरकारला महाराष्ट्रात पोलीस दल विशेष कायदा (पाफ्सपा) लागू करुन पोलिसांना असीमित अधिकार द्यायचे आहेत.' असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement