एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : नवऱ्याला सोडून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक 

Bhiwandi Crime News : हत्या करून आरोपी त्याच्या पश्चिम बंगालमधील मूळ गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

भिवंडी : नवऱ्याला सोडून  प्रियकरासोबत  लिव्ह  इन  रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या  एका  35   वर्षीय  महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेचा मृतदेह  तिच्या राहत्या  घरातील  किचनमध्ये   गळा  चिरलेल्या  अवस्थेत  मृतदेह  आढळला होता. ही  घटना   भिवंडी तालुक्यातील  कोनगाव (Bhiwandi Murder) येथील गणेशनगर मधील एका घरात  घडली.  मात्र  तिच्या  सोबत  राहणारा  प्रियकर  घटनेच्या दिवसापासून  फरार  झाला  होता. फरार प्रियकराला पोलीस पथकाने वेषांतर करून पश्चिम बंगालच्या एका रुग्णालयाच्या दारातच झडप घालून अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटक  आरोपीचे  नाव  आहे.  तर  मधु प्रजापती  ( वय 35 ) असे मृतक महिलेचे नाव आहे.

Bhiwandi Murder  News : धारधार कटरने गळा चिरला 

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, मृतक  मधू ही नवऱ्यापासून विभक्त राहात होती. आरोपी  शब्बीर  हा  मूळचा पश्चिम बंगाल राज्यात राहणारा असून त्याला पत्नी आणि आठ वर्षाची मुलगी आहे. तो कुटुंबाच्या उपजीविकेसाठी  अंबरनाथ  एमआयडीसीतील एका  कंपनीत  कामाला  होते. त्यावेळी  दोघांची  ओळख  होऊन  प्रेमाचे  सूत  जुळल्याने  दोघांमध्ये  अनैतिक  संबध  निर्माण  झाले.  त्यानंतर  या  दोघांनी  कोनगाव  भागात  गणेश  नगर  येथील खोली भाड्याने  घेऊन  त्यामध्ये  लिव्ह  इन  रिलेशनशिपमध्ये  राहत  होते.  मात्र आरोपी प्रियकर हा मृतक महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत होता.  त्यातच 15  सप्टेंबर  रोजी  दोघांमध्ये  याच   कारणावरून  भांडण  होऊन  आरोपी  शब्बीरने   मधूचा  धारदार  कटरने  गळा चिरला  तसेच  दोन्ही  हातच्या  नसा  कापून  तिला  ठार  मारले  आणि   घराला  बाहेरून  कुलुप  लावून  पळून  गेला.

खोलीतून दुर्गंधी येत होती

या  खोलीतून  दुर्गंध  येत  असल्याने  आजूबाजूच्या  नागरिकांनी  कोनगाव  पोलिसांना  याबाबत  माहिती  दिली.  त्यांनतर  वरिष्ठ  पोलीस  निरीक्षक  राजेंद्र  पवार  आणि  गुन्हे  पोलीस  निरीक्षक  दीप  बने  हे  पोलीस  पथकासह  घटनास्थळी  दाखल होत  खोलीच्या   दरवाजाचे  कुलूप  तोडून   घरात  गेले  असता  घरातील  किचनमध्ये   मधूचा   गळा  चिरलेल्या  अवस्थेत  मृतदेह  आढळून  आला.  त्यानंतर   कोनगाव  पोलिसांसह  फॉरेन्सिक  पथक   पोलिसांनी  घटनास्थळाचा  पंचनामा  करून मृतदेह उत्तरीय  तपासणीसाठी  मुंबई  येथील  जे.   जे.  रुग्णालयात   पाठवला. 

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध 

मृतक  मधूची  मैत्रीण  अनिता  शर्मा  (रा.कोनगाव )  हिच्या  फियादीवरून  आरोपी  शबीर  याच्यावर  19  सप्टेंबर  रोजी  पहाटेच्या  सुमारास  भादंवि  कलम 302 प्रमाणे  कोनगाव  पोलीस  ठाण्यात  गुन्हा  दाखल  केला.  घटनास्थळावरून  पोलिसांनी  एक  धारदार   कटर  जप्त  केला.  दुसरीकडे   ज्या   खोलीत  मृत   महिला  एकटीच  राहत  होती त्या ठिकाणी  तिच्यासोबत  आणखी  एक  महिला  किंवा  कधी  कधी  एक  पुरुषही  राहत  असल्याची   माहिती  पोलीस  पथकाला  तपासात  समोर  आली  होती.  घटनास्थळ  परिसरातील  सीसीटीव्ही फुटेज  आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालमधील उत्तरदिनाजपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो मूळ  गावी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

वेषांतर करून पोलिसांनी आरोपीला पकडले

शिवाय  घटनेच्या दिवशी प्रेयसीसोबत झालेल्या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो पश्चिम बंगालमधील सासुरवाडी असलेल्या सारापूर गावातील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेल्याचे समोर आले.  एपीआय वैभव चुंबळे, विनोद कडलक यांच्यासह कोनगाव पोलीस पथक रुग्णालयात आवारात वेषांतर करून सापळा रचला होता. त्याच सुमाराला हातच्या दुखापत झालेल्या ठिकाणी उपचार करून बाहेर पडताच, त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पश्चिम बंगालवरून 21 सप्टेंबर रोजी  कोनगाव पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी  दिली आहे.  या  गुन्ह्याचा  अधिक   तपास  पोलीस  निरीक्षक  (गुन्हे)  दीप  बने  करीत  आहेत.  

संबंधित बातमी :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Second News | 9 सेकंदमध्ये बातमी राज्यातील बातम्यांचा वेगवाना आढावा सुपरफास्ट ABP MajhaPune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget