एक्स्प्लोर
खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका, प्रकृती स्थिर

भंडारा : भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोले यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आज सकाळी शिवणीबाध येथे विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचं उदघाटन करताना ही घटना घडली. स्पर्धेला हिरवा झेंडा दिल्यानंतर पटोलेंना भोवळ आली, त्यानंतर त्यांना स्थानिक रूग्णालयात हलवण्यात आलं. तेथून त्यांना नागपूरच्या मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे. नाना पटोलेंसोबत भाजपचे डॉ. परिनय फुके , राष्ट्रवादीचे नेते सुनिल कुंडे हे नेते उपस्थित आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























