एक्स्प्लोर

अब्दुल सत्तार यांना आणखी एक दणका; वाळू ठेक्याच्या मुदतवाढ आदेशाच्या अंमलबजावणीस खंडपीठाची मनाई

Uurangabad News : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या वाळू ठेक्याच्या मुदतवाढ आदेशाची पुढील तारखेपर्यंत अंमलबजावणी करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

Uurangabad News Update : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या वाळू ठेक्याच्या मुदतवाढ आदेशाची पुढील तारखेपर्यंत अंमलबजावणी करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे. बीडचे नगरसेवक अमर जैनुद्दीन शेख यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. 

वाळू ठेक्याच्या मुदतवाढ आदेशाच्या अंमलबजावणीस मनाई करण्यासह संबंधित याचिका जनहित याचिका म्हणून रुपांतरित करण्याची याचिकाकर्त्यांची विनंती खंडपीठाने मान्य केली आहे. याप्रकरणी प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. 

अब्दुल सत्तार यांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश देऊन राक्षसभुवन येथील वाळू ठेकेदाराला गेवराई तालुक्यातील सावरगाव येथून वाळू उचलण्याची परवानगी दिली होती. सत्तार यांच्या या आदेशाला नगरसेवक अमर शेख यांनी ॲड. सचिन देशमुख यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. 

ठेकेदाराला कुठल्याही परिस्थितीत वाळू ठेक्याचे स्थळ बदलून मिळणार नाही  आणि मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय 12 मार्च 2013 ला आणि 28 जानेवारी 2022 रोजी शासनाने जाहीर केला आहे. असे असतानाही महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू ठेकेदाराच्या ठेक्याला मुदतवाढ देणारा आदेश दिला आहे. त्यामुळे महसूल राज्यमंत्र्यांनी असे किती आदेश दिले आहेत? याबद्दल माहिती घेण्याची तोंडी विनंती याचिकार्कत्यांच्या वतीने करण्यात आली आहे.  

काय आहे प्रकरण? 
शासनाने 2012-13 ला शेख सलीम अब्दुल कादर पटेल यांना कुरण-पिंपरी येथे वाळूचा ठेका दिला होता. परंतु, पटेल यांनी अटींचा भंग केला. त्यामुळे त्यांना नऊ कोटी 76 लाख रुपये दंड आकारून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पटेल यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. त्यावर पटेल यांनी शिक्षेविरोधात अपील केली होती. परंतु, त्यांचा अपीलाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

पटेल यांचे शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळल्यानंतर त्यांची पुनर्विलोकन याचिका खंडपीठात प्रलंबित आहे. शासनाने त्यांना काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर वाळू ठेक्याचे ठिकाण बदलून देता येणार नाही आणि मुदतही वाढवून मिळणार नाही, असा शासन निर्णय 12 मार्च 2013 ला काढण्यात आला होता. असे असताना राज्यमंत्री सत्तार यांनी संबंधित शासन निर्णय डावलून 1 एप्रिल 2021 ला पटेल यांना पैठण तालुक्यातील घाणेगाव येथील वाळूचा ठेका दहा महिन्यांसाठी दिला होता. त्याची मुदत 1 फेब्रुवारी 2022 ला संपली आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देऊन 10 फेब्रुवारी 2022 ला पटेल यांना पुन्हा दोन हजार 556 ब्रास वाळू उचलण्याची परवानगी दिली

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget