एक्स्प्लोर
पत्नी जखमी झाल्याने बीडच्या मांझीचा रस्त्यांवर अनोखा संताप
बीड : खड्डेयुक्त रस्त्यानं जाताना पत्नी जखमी झाली, आणि एक मांझी संतापला. पण त्याने संतापाच्या भरात ना आंदोलन केलं, ना निदर्शनं, ना घोषणाबाजी... मात्र त्याने केलेलं कामही तितकंच डोळे उघडणारं आहे.
बीडच्या केज तालुक्यातल्या धनेगावच्या रस्त्यावरचं काम सरकारी नाही, खाजगी आहे. मारोती सोनावणे यांनी पदरमोड करुन सुरु केलेल्या रस्त्याच्या कामाचं कारणही तितकंच भन्नाट आहे.
बायकोला जखमी करणाऱ्या खड्ड्यांचा राग मारोतीरावांच्या डोक्यात गेला. पण जिथं पोटातला खड्डा भरायचे वांधे, तिथे रस्त्यातले खड्डे भरायचे कसे? हा प्रश्नही महत्त्वाचा होता. अखेर त्यांनी पत्नीच्या गळ्यातला दागिना विकला.
जोडप्यानं 3 दिवसात खड्ड्यांना बुजवून टाकलं... आणि या दोघांच्या जीवावर गाड्यांचा वेग वाढला. मारोतीरावांनी ना आंदोलन केलं... ना राडा केला... त्यांनी आपला सगळा राग काढला तो खडड्यांवर... पण ते इथंच थांबणार नाहीत. रस्त्याचं काम करणारे मजूरही म्हैस विकण्याची तयारी दर्शवतात.
मारोतीरावांनी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर फक्त नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येऊ नये... अन्यथा त्यांच्या निष्क्रीयतेच्या खड्ड्यांचे धक्के त्यांना सहन होणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement