Beed: गेवराई तहसीलदारांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन, नेमकं प्रकरण काय?
Beed: गेवराई मध्ये वाळू तस्करावर मोठी कारवाई सुरू आहे. यासंदर्भात चौकशीसाठी सचिन खाडे हे घरी आले आणि त्यांनी उद्धट भाषा वापरली, अशी तक्रार गेवराईमधील तीन महिलांनी केली आहे.
Beed: बीडमधील गेवराईच्या तहसीलदाराविरोधात एकाच वेळी 3 महिलांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर तहसीलदारांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन केलं. सचिन खाडे असं संबंधित तहसीलदारांचं नाव आहे. वाळू तस्कर विरोधात कारवाई केली म्हणून गुन्हा दाखल झाल्याचं तहसीलदारानं म्हटलं आहे.
गेवराई मध्ये वाळू तस्करावर मोठी कारवाई सुरू आहे. यासंदर्भात चौकशीसाठी सचिन खाडे हे घरी आले आणि त्यांनी उद्धट भाषा वापरली, अशी तक्रार गेवराईमधील तीन महिलांनी केली आहे. एवढेच नव्हेतर सचिन खाडे यांनी घरात घुसून चौकशी करून दमदाटी केल्याच्या तक्रारात म्हटलंय. दरम्यान, सचिन खाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करतातच बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन करून निषेध नोंदवला. जिल्ह्यातल्या कोणत्याही प्रश्नावर सर्वसामान्य नागरिक ज्यांच्या दारासमोर उभा टाकून निषेध नोंदवतात. त्याच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी एकवटले होते. तहसीलदार पदावरच्या मोठ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने बीडचे राजकारण सुद्धा ढवळून निघताना पाहायला मिळतंय. राजकीय दबावापोटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल झाल्याची ही गेवराईमध्ये जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या महितीनुसार, बीड जिल्ह्यामध्ये एक ही वाळूचा ठेका अधिकृत लिलावात आलेला नाही. तरीसुद्धा महसूल प्रशासन कायम वाळूतस्करा वर कारवाई करत असतात व प्रश्न उपस्थित होतोय की जर एकही वाळूचा ठेका अधिकृत झाला नसेल तर मग एवढी मोठी वाळू कुणाच्या सहकार्यानं वाळूतस्कर काढत असतात, असं गेवराईचं डीव्हायएसपी यांनी म्हटलं आहे.
वाळू हा तसा केवळ गुन्हेगारी स्वरूपाचा व्यवसाय नाही. तर, याच वाळूच्या व्यवसायात भोवती प्रशासन आणि राजकारण कायम फिरताना पाहायला मिळतंय. गेवराई च्या प्रकरणात नेमकं कोण चुकीचं आणि कोण बरोबर? हे ठरवण्याआधी वाळूच्या धंद्यात कुणाकुणाचे हात मळलेले आहेत? हे सुद्धा बघणं तितकच महत्त्वाचं आहे.
हे देखील वाचा-
- Beed News : धारुर किल्ल्यातील तोफगोळेच गायब, शिवभक्तांकडून संताप व्यक्त
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी रुग्णसंख्या हजाराच्या आत, 806 नव्या रुग्णांची भर
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी रुग्णसंख्या हजाराच्या आत, 806 नव्या रुग्णांची भर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha