एक्स्प्लोर

Beed News : धारुर किल्ल्यातील तोफगोळेच गायब, शिवभक्तांकडून संताप व्यक्त

Beed News: बीडच्या धारुर किल्ल्यात शिवप्रेमींनी एका खोलीमध्ये सुरक्षित ठेवलेले 15 तोफगोळेच चोरी झाल्याची घटना घडली आहे.

Beed News: नुकतीच राज्यभरात शिवजयंती (Shivjayanti 2022) उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यभरातील शिवभक्तांनी विविध गडकिल्ल्यांना भेट देत स्वच्छता मोहिम राबवली. दरम्यान बीडमधील धारूर किल्ल्याला शिवभक्तांनी भेट दिली असता, काही काळापूर्वी त्याठिकाणी ठेवलेले तोफ गोळे गायब झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे शिवभक्तांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवप्रेमींनी या धारुर किल्ल्याला भेट देत त्याठिकाणी साफसफाई करत अस्ताव्यस्त पडलेले तोफगोळे जमा करून 15 दगडी तोफगोळे किल्ल्यातीलच एका खोलीत ठेवले. ज्यानंतर पुन्हा एकदा धारूरच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवप्रेमींनी गड स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी मात्र किल्ल्यातील अनेक दगडी तोफ गोळे गायब असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसंच पुरातत्व विभागाने लवकरात लवकर हा किल्ला संरक्षित नाही केला, तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा मनसे चित्रपट सेनेने दिला आहे.

कसा आहे किल्ले धारुर?

बीड जिल्ह्यात एकमेव किल्ला म्हणून धारूर किल्ल्याला (Dharur Fort) ओळखले जाते. किल्ल्यामुळेच धारूरची  ‘किल्ले ए धारूर’ अशी ओळख निर्माण झाली. बीड जिल्ह्यातील धारूर येथील भुईकोट किल्ला एक महत्वाची वास्तु आहे. आदिलशाहीमधील सेनापती किशवरखान याने हा किल्ला 1569 मध्ये बांधला. किल्ल्यास मिळालेली उत्तम भौगोलिक रचना आणि त्याची भक्कम बांधणी यामुळे हा किल्ला त्या काळात संरक्षण दृष्ट्या महत्वाचा मानला जात होता. किल्ल्याची मुख्य भिंत डोंगराच्या कडेवर शंभर फुटाहून अधिक उंच आहे. भिंतीला लागूनच खोल दरी आहे. किल्ल्यावर पंचीवीसहून अधिक टेहळणी बुरज आहेत. किल्ल्यात गोड्या पाण्याचे तळे आणि खाऱ्या पाण्याचे तळे आहे. ज्यांना खारी दिंडी आणि गोडी दिंडी म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावर उत्तरेकडील बुरूजावर असलेली आईना महल नावाची वास्तु काही वर्षापूर्वी जमीनदोस्त झाली. बालाघाटवर ताबा ठेवण्यासाठी धारूरचा किल्ला महत्वाचा मानला जात होता.  

महत्त्वाच्या बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Discharge : अनिल देशमुख यांना रुग्णालयातून  डिस्चार्ज ABP MajhaHitendra Thakur On Vinod Tawde :  टीप कुठून, केव्हा, कशी मिळाली? राड्यानंतर ठाकूरांची स्फोटक मुलाखतABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Embed widget