Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी रुग्णसंख्या हजाराच्या आत, 806 नव्या रुग्णांची भर
Maharashtra Corona Update : राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 806 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर 32 महानगपालिकांमध्ये कोरोनाची एकेरी संख्येची नोंद झाली आहे. तर 58 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
राज्यात आज 53 ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज 53 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 515 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 97 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.94 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 76 हजार 378 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1036 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 96 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 96 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 96 रुग्णांपैकी 17 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 308 बेड्सपैकी केवळ 807 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
संबंधित बातम्या :