एक्स्प्लोर
राज ठाकरेंच्या नावे अंबाजोगाई न्यायालयाचे अटक वॉरंट
बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावे अंबाजोगाई न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. बीडमधील 2008 सालच्या प्रकरणात राज ठाकरेंना अटक होण्याची शक्यता आहे.
2008 साली राज ठाकरेंनी परप्रांतीयाविरुद्ध चिथावणीखोर भाषण केल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्यात अंबाजोगाईतही मनसे कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली होती. बसेसचं नुकसान केल्याप्रकरणी अंबाजोगाईच्या न्यायालयात राज ठाकरेंसह दहा जणांविरुद्ध गु्न्हा नोंद झाला होता.
न्यायालयाच्या कामकाजासाठी राज ठाकरे सतत गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुरणे यांच्या न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement