एक्स्प्लोर

Bachchu Kadu : ... तर लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू; बच्चू कडू यांचा इशारा

कर्जमाफीमधील जाचक अटींमुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. आतापर्यंत झालेल्या दोन्ही कर्जमाफी एकत्र करुन सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कडू म्हणाले.

Bachchu Kadu on Bank Land Auction : नागपुरातील महाल परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रहारतर्फे आंदोलन करण्यात आले. लिलावात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणाऱ्यांचे हातपाय तोडू असा गर्भित इशारा आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला. तसेच प्रहारच्या आंदोलनानंतर कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची लिलाव प्रक्रिया बँकेकडून अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी गहाण ठेवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यापैकी अनेक कर्जखातेधारकांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेकडून गहाण असलेल्या मालमत्तांचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यासंदर्भात अनेक कर्जदारांना नोटीसही बजावण्यात आली होती. बँकेने ही लिलाव प्रक्रिया थांबवावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली होती.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने काही दिवस लिलाव प्रक्रिया पुढे ढकलल्यानंतर पुन्हा एकदा लिलाव प्रक्रिया सुरु केल्यामुळे आजची लिलाव प्रक्रिया उधळून लावण्यासंदर्भातले आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात केले. 

बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमधील आंदोलनानंतर बँकेने आज जाहीर केलेला शेतकऱ्यांच्या गहाण जमिनीचा लिलाव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर कर्ज प्रकरण आणि लिलाव संदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बँकेचे कार्यकारी अधिकारी चितरंजन नाईक यांनी दिली.

माणूसकीने विचार करावा...

निसर्गाचे कोप, सततची नापिकी आणि काही करुन उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला तर शेतमालाला मिळणारे अल्पदर यामुळे बळीराजा आधीच हवालदिल झाला आहे. कर्जाच्या डोंगरांखाली शेतकरी दबला आहे. या तणावामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थिती अन्न देणाऱ्या बळीराजाला साथ देण्याची गरज असताना बँकांकडून त्यांच्या जमिनीही हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे बँकेने माणूसकीने विचार करुन कठोर भूमिका घेणे टाळावे असे आवाहनही यावेळी बच्चू कडू यांनी केले आहे.

कर्जमाफीची फक्त घोषणाच मोठी

राज्य सरकारच्या कर्जमाफीसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "आतापर्यंत एकवेळा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना अशी दोनवेळी कर्जमाफी झाली आहे. मात्र त्यातील जाचक अटींमुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या दोन्ही कर्जमाफी एकत्र करुन सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटणार आहे."

ही बातमी देखील वाचा...

नागपुरात कारनं माय-लेकाला चिरडलं; फरार कंत्राटदाराला वरोरा येथून अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget