एक्स्प्लोर

छत्रपती संभाजीनगर मधील बच्चू कडूंच्या मोर्चाला परवानगी नाकारली; मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवतंय ते बघू, बच्चू कडूंचा निर्धार 

Bacchu Kadu : प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे होणाऱ्या भव्य मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Politics अमरावतीप्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे होणाऱ्या भव्य मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते.

मात्र उद्याला होणाऱ्या या भव्य मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोठा पेच उभा राहिला आहे. ही परवानगी नेमकी का नाकारली, हे अद्याप तरी कळू शकलं नाही. मात्र परवानगी नाकारली असली तरी आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे जाणारच आणि लाखोंच्या उपस्थितीत हा मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या मोर्चा कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

आम्हाला कोण अडवतंय ते बघू, बच्चू कडूंचा निर्धार     

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू हे संभाजीनगर येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर यांचा मोर्चा काढणार होते. सोबतच या मोर्च्यातून पुढील राजकीय वाटचाल आणि तिसऱ्या आघाडी बद्दल अधिकृत घोषणा करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे राज्याचे राजकारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन तापलं असताना, बच्चू कडू हे देखील वेळो वेळी आपली वेगळी भूमिका मांडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसले आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर मग राजकीय वाटचाली संदर्भात अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती या पूर्वीच बच्चू कडू यांनी दिली आहे.

मात्र, आता ऐनवेळी या भव्य मोर्चाला परवानगी नाकारल्याने बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून आम्ही हा मोर्चा कुठल्याही परिस्थित काढूच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे उद्या या मोर्च्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथं नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू 

आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू, असेही बच्चू कडू म्हणाले. सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्‍याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्‍यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे.

तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्‍याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर  मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकारMNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणारदुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 September 2024NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Embed widget