एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादमध्ये मोबाईल फोनच्या बॅटरीसोबत खेळताना स्फोट, दोन मुलं जखमी
कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8 वर्ष) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5 वर्ष) अशी या मुलांची नावं आहेत.
औरंगाबाद : मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन मुलं जखमी झाल्याची घटना औरंगाबादच्या शिऊरमध्ये घडली आहे. या स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कृष्णा रामेश्वर जाधव (वय 8 वर्ष) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5 वर्ष) अशी या मुलांची नावं आहेत.
शिऊरमधील घोडके वस्तीत आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा आणि कार्तिक हे दोघे भाऊ मोबाईल फोनची बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत होते. मात्र त्याच वेळी बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भावंडांच्या हाताला गंभीर इजा झाली.
VIDEO | मोबाईल फोनच्या बॅटरीची स्फोट, दोन मुलं जखमी | औरंगाबाद | एबीपी माझा
याआधीही मोबाईल स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल फोन चार्जिंगला लावून फोनवर बोलल्यामुळे स्फोट झाल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातच आता मोबाईल फोनच्या बॅटरीच्या स्फोटाचा प्रकार समोर आला आहे. हा स्फोट कसा झाला, मोबाईल कोणत्या कंपनीचा होता हे अजून समजलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
भारत
बातम्या
Advertisement