एक्स्प्लोर

औरंगाबादच्या कचराकोंडीचा दहावा दिवस

गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे.

औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कचराकोंडी फोडण्याचा दुसरा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला आहे. बागडे यांनी काल नारेगावच्या ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली. मात्र, आंदोलक कचरा न टाकू देण्यावर ठाम आहेत.तर पालकमंत्री दीपक सावंत आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनीही ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही अपयश आले. सध्या औरंगाबादेत ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे 15 लाख शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरातील कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी राहुल कुलकर्णी या नागरिकांने औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल केली आहे.या याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. काय आहे प्रकरण? नरेगावमध्ये महापालिकेचा कचरा डेपो आहे. हा डेपो बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 15 वर्षांपूर्वी दिले होते. यानंतर महापालिकेने पर्यायी जागेचा शोध सुरु केला. पण महापालिकेला अद्याप पर्यायी जागा मिळाली नाही. त्यामुळे नारेगावचे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी गावाजवळील कचरा डेपोत कचरा न टाकू देण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून शहरात कचराकोंडी सुरु झाली. हा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री दीपक सावंत, औरंगाबादचे महापौर आणि आयुक्त यांची बैठक झाली. त्यानंतर दीपक सावंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, पालकमंत्री दीपक सावंत यांच्यासह अनेक मंत्र्यांनी ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण यात कोणालाही यश आलं नाही. काल हरिभाऊ बागडे यांनीही ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पण ग्रामस्थांनी कचरा न टाकू देण्याची ठाम भूमिका घेतली. त्यामुळे सध्या औरंगाबाद शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
SEBI : सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष, 68 जणांची नोंदणी रद्द
सेबीचा गुंतवणूक सल्लागारांना मोठा दणका, सेबीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, 68 जणांची नोंदणी रद्द
Nitesh Rane on Cash: आमच्याकडे मोदी अन् फडणवीस आहेत, भाजपला निवडणुकीसाठी मनी पॉवरची गरज नाही: नितेश राणे
भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये एवढी मोठी कॅश कुठून आली? नितेश राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'आम्हाला पोटापाण्यासाठी...'
Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप
संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलिसांची धाड, गुंडाच्या घरासारखी झाडाझडती घेतली; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर आरोप
WPL 2026 Auction: वनडे वर्ल्ड कपध्ये दमदार कामगिरीचा फायदा, डीएसपी दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, UP किती कोटी मोजले?
DSP दीप्ती शर्मावर सर्वाधिक बोली, उत्तर प्रदेशनं RTM कार्ड वापरलं, कोट्यवधी रुपये मोजले
Embed widget