एक्स्प्लोर
CCTV : गणपतीच्या वर्गणीसाठी नगरमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण
अहमदनगर : अहमदनगरमध्ये गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून राजू पाटोळे या दुकानदाराला आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही, तर मारहाणीनंतर हे दाम्पत्य उपचारासाठी रुग्णालयात गेल्यावर तिथेही त्यांना मारहाण करण्यात आली.
पती राजू पाटोळे यांना सोडवण्यास गेलेल्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर दुकानाचीही तोडफोड केली आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून जमाव बेदम मारहाण करताना दिसतो आहे. या मारहाणीमुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
भर दिवसा रुग्णालयात घडलेल्या या घटनेनं रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घटनेचं गांभीर्य वाढलं आहे. वर्गणीवरुन मारहाणीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस किती कडक कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
Advertisement