विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतःच्या कामासाठी कार्यालय वापरतात, ठाकरे गटाचा आरोप
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे स्वतःच्या कामासाठी आणि यंत्रणेसाठी कार्यालय वापरत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे.
Rahul Narvekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे स्वतःच्या कामासाठी आणि यंत्रणेसाठी कार्यालय वापरत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सध्या सरकारी कार्यालय वापरत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील कार्यालय वापरत आहेत. त्यांच्यावर राज्यपालांनी कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे उपनेते राजकुमार बाफना यांनी केली आहे.
राज्यात आचारसंहिता लागू
15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून राज्यात आचारसंहिता लागू देखील करण्यात आली आहे. असे असताना विधान,भा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सरकारी कार्यालयाचा गैरवापर करत आहेत. सरकारी कार्यालयातील यंत्रणांचा वापर देखील स्वताच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते राजकुमार बाफना यांनी केलाय. ही चुकीची बाब आहे. निवडणूक आयोगानं याची दखल घेऊन त्यांच्याविरोधात कारवाईक करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग
दरम्यान, राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढवल्या आहेत. इच्छुकांनी गठी भेटी सुरु केल्या आहेत. तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु होताना दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधाऱ्यांची महायुती यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ही निवडणूक अनेक मुद्यांनी गाजणार आहे. अनिक ठिकाणी तुल्यबळ लढती होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला मतादन प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यानंतर राज्याचे नवे कारभारी कोण हे ठरणार आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दोनिहीकडील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत. यामुलं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा देखील झाली आहे. त्यामुळं राज्या तजोरात प्रचाराला सुरुवात झाली आहे. अद्या पजागावाटपाचा निर्णय झालेला नाही. तो निर्णय झाल्यानंतरच कोण किती जागांवर निवडणूक लढवणार हे सागंणं शक्य होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: