एक्स्प्लोर
कार्यकर्त्यांच्या घरचं प्रेमाचं जेवण, सोन्याचं ताट नाही : चव्हाण
सोलापूर : उस्मानाबादमध्ये काँग्रेस नेत्यांनी सोन्याच्या ताटात शाही जेवण केल्याच्या आरोपानंतर प्रदेशाध्यक्षांनी हा दावा खोडून काढला आहे. सोन्याच्या ताटात जेवल्याचा प्रचार चुकीचा आहे, हा शोध कोणी लावला कोणास ठाऊक, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेस नेते सोन्याच्या ताटात जेवल्याचा प्रचार चुकीचा आहे. ते कार्यकर्त्यांच्या घरातलं प्रेमाचं जेवण होतं. मात्र त्यासाठी सोन्याचं ताट नव्हतं, हा शोध कुणी लावला माहित नाही, असा खुलासा अशोक चव्हाण यांनी सोलापुरात केला आहे.
काँग्रेसने उस्मानाबादच्या येणगुरमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी काँग्रेस नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला होता. जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताट-वाट्या होत्या.
सोनेरी ताट-वाट्यांमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकुरकर यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. नांदेडमधल्या कॅटरर्सकडून ही सोन्याचा मुलामा असलेली भांडी मागवण्यात आल्याची माहिती आहे.
उस्मानाबादमध्ये काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही जेवण
उद्धव ठाकरेंना मराठी माणसाची अस्मिता असेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं, असं आवाहनही अशोक चव्हाणांनी केलं. भाजप-शिवसेनेचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे केवळ एक नाटक आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. लोकांना कॅशलेसचं आवाहन करायचं आणि नेत्यांनी उमेदवारीसाठी कॅश मागायची हे कसलं सोंग, या शब्दात नाशिकमधील भाजप अध्यक्षाने पैसे घेतल्याच्या प्रकरणावर अशोक चव्हाण यांनी उपरोधिक टीका केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement