एक्स्प्लोर
'आप'चे आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत, शेलारांचं प्रत्युत्तर
मुंबई : ‘आप’ नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे शिळ्या कढीला ऊत आणल्यासारखं आहे. राजकीय हेतूने बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात आलेले आहेत, असं स्पष्टीकरण मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं आहे.
आशिष शेलार हे घोटाळ्यांचे महारथी आहेत. त्यांनी रिद्धी कंपनी, जी काही व्यवसाय करत नाही, तरीही ती इतका पैसा कमावते. त्यामुळे आशिष शेलारांनी महाघोटाळा केला आहे, असा आरोप प्रीती शर्मा-मेनन यांनी केला आहे. शिवाय त्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
https://twitter.com/ShelarAshish/status/876020600015290369
आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण :
- माझ्यावर जे आरोप केले गेले आहेत ते जुनेच आहेत. त्याचा वेळोवेळी मी सविस्तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे.
- सर्वेश्वर आणि रिध्दी या दोन कंपन्यांच्या नावे माझ्यावर आरोप करण्यात आले असले तरी माझा आता या कंपन्यांशी कोणताही संबंध नाही. मी राजीनामा दिल्याचे आणि अन्य कागदपत्र संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत.
- अन्य कपंन्यांची आणि व्यक्तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत, ती खोडसाळपणे जोडली जात आहेत.
- माझी कुणाशीही भागीदारी नाही. तसेच मी कुठल्याही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्यामुळे त्या कंपन्यांमधील कोण्या अन्य व्यक्तीचे कुणाशी असलेल्या व्यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्यांची कल्पना नाही.
- छगन भुजबळ यांची जी चौकशी सुरू आहे. त्याच्याशी संबंधित कंपन्या, व्यक्तीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कोणताही संबंध नाही. त्यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत.
- रियाज भाटी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे त्याने जाहीरपणे सांगितले आहे. त्याचा माझ्याशी काहीही संबध नाही. तो एका क्लबचा मेंबर असल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो मतदार आहे. त्याचे माझ्यासह अन्य सर्वपक्षीय नेत्यांसोबत फोटो आहेत.
- वानखेडे स्टेडियम आणि बीकेसीतील क्लबबाबत जे आरोप केले आहेत, त्यावेळी मी एमसीएचा अध्यक्ष अथवा व्यवस्थापकीय कार्यकारणीचा सदस्यही नव्हतो. त्यामुळे त्यांच्याशी माझे नाव जोडणे हे निव्वळ माझ्यावर अन्याय करणारं आहे. ते आरोप व्यक्तीगत आकसातून करण्यात येत आहेत.
- भाजपाचे अन्य मंत्री आणि माझे सहकारी यांच्याबाबतही जुनेच आरोप पुन्हा एकदा नव्याने करण्यात आले आहेत. त्याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खुलासा केलेला आहे.
संबंधित बातमी : आशिष शेलार घोटाळ्यांचे महारथी : प्रीती शर्मा-मेनन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement